Hasan Mushrif and A.Y. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bidri Sugar Factory Election: मुश्रीफांचे प्रेम झाले पातळ; स्वतःचा पराभव मान्य केला

Rahul Gadkar

Kolhapur News: बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र असलेले मेहुणे-पाहुण्याच्यांत फिस्कटल्यानंतर ए.वाय.पाटील यांनी विरोधकांचा रस्ता धरला. ए.वाय.पाटील यांची मनधरणी करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रयत्नांची पारकाष्टा केली. मात्र, मंत्री मुश्रीफ यांना याबाबत अपयश आले. आलेल्या अपयशामुळे मंत्री मुश्रीफ यांनी जाहीरपणे आपला पराभव मान्य केला आहे.

"ए.वाय.पाटील यांच्यावर विश्वास होता. ते आम्हाला सोडून जाणार नाहीत. असे वाटत होते. मात्र, त्यांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी मला अपयश आले. माझा त्या ठिकाणी पराभव झाला. त्यांना कोणती गोष्ट जड हे मला सांगता येणार नाही. माझं प्रेम पातळ झालं", अशा शब्दात मुश्रीफ यांनी आपली भावना व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"ही निवडणूक धर्माची महाभारतातील लढाई आहे. अर्जुन म्हणून के.पी.पाटील यांच्या हातात धनुष्य दिला आहे. श्रीकृष्ण म्हणून मी आणि आमदार सतेज पाटील हे महाभारत सांगणार आहोत. समोर कोण आहे, हे न बघता धर्म-अधर्माची निवडणूक लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून आमची आघाडी विजय मिळवेल", असा विश्वास पालकमंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

"गेल्या पाच वर्षांपासून बिद्री कारखान्याचा कारभार अत्यंत सुरळीत व पारदर्शक सुरु आहे. सहकारातील राजकारण व राजकारण वेगळे आहे. यावेळी फारकत असलेले विचार एकत्र येत असतात. हीच बिद्रीच्या निवडणुकीत झाले आहे. राज्यात सर्वात जास्त बिद्री सहकारी साखर कारखान्यांना दिला आहे. विरोधकांनी डोळे उघडून कारखान्याचा कारभार पहावा तेही सहमत होतील", असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

'बिद्री'च्या निवडणुकीची धुरा सतेज पाटील सांभाळणार ?

सतेज पाटील यांनी या निवडणुकीची धुरा हाती घेतली आहे. त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. संकटाच्या काळात सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्याचे कामं बिद्रीने घेतले आहे. अनेक आव्हाने असताना देखील के.पी पाटील यांनी हा करखना चांगला चालवला. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे निर्णय घेईल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT