SugarCane FRP Issue : राजू शेट्टी आक्रमक; ‘आठ दिवस थांबा, कारखानदारांना गुडघे टेकायला लावतो’

Raju Shetti News : कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिसरी बैठक निष्फळ झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तिसरी बैठक निष्फळ झाल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अंतिम टप्प्यात असून, आता फक्त आठ दिवस थांबा, कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. (Former MP Raju Shetti aggressive on sugarcane price issue)

आक्रोश यात्रा आणि ठिय्या आंदोलनानंतरही कारखानदार या आंदोलनाला बेदखल करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. त्यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी शेट्टी यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी कारखानदारांच्या क्षेत्रात जाऊन सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti
Balasaheb Thackeray Memorial Day : कडेकोट बंदोबस्तात ठाकरे कुटुंबीयांनी घेतले बाळासाहेबांच्या स्मृतींचे दर्शन

राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी (ता. १६ नोव्हेंबर) पुढील रणनीती ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना कारखानदार आणि सरकारला खणखणीत इशारा दिला आहे.

गेल्या वर्षी ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील एफआरपी एकरकमी घेऊ शकलो. मात्र, साखर विक्री झाली नाही. साखरेचे दर वाढले, विक्री झाली. मग आता तुम्ही त्याचा मोबदला द्यायला का कारकूर करता? असा सवालही माजी खासदार शेट्टी यांनी केला.

Raju Shetti
Solapur Politics : मी निवडून आलो नसतो तर शिवदारेअण्णा मंत्री झाले असते; सुशीलकुमारांनी सांगितली १९७४ ची आठवण

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे कसे देता येतील, याचा हिशेब पालकमंत्री मुश्रीफ यांना सांगितला आहे. पण, त्यांनी देता येत नाही अशी भूमिका घेतली. पण, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा देऊन शेट्टी म्हणाले की, शेतकरी अजून एक महिना थांबायला तयार आहेत. तुटलेला ऊस नेताना जर नुकसान झाले तर कारखानदाराकडून लिहून घ्या, असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

शेतकऱ्यांच्या बाजूचे नेमके कोण?

ऊसदरासाठी आक्रोश यात्रा, ठिय्या आंदोलन केले. मात्र, त्याला अगदी विरोधी पक्षांनीही पाठबळ दिले नाही. मग शेतकऱ्यांच्या बाजूचे नेमके कोण आहेत, असा उद्‌विग्न सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Raju Shetti
Konkan graduate Election : 'फॉर्म कसा भरायचा, मतदान कसं करायचं'; राज ठाकरेंनी घेतला मनसैनिकांचा वर्ग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com