Kolhapur Politics Suresh Ghadge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : भाजपचा बडा नेता शरद पवार गटाने फोडला; चंदगडमध्ये ताकद वाढली!

संभाजी थोरात

Kolhapur News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यावर राष्ट्रवादीत फूट पडून, पक्षाचे दोन गट पडले. यानंतर पक्षातील अनेक आमदार, पदाधिकारी शरद पवार यांना सोडून जात आहेत. मात्र चंदगड तालुक्यात शरद पवार (Suresh Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट सत्तेत असलेल्या भाजपालाच भगदाड पाडले आहे. भाजपाचे नेते सुरेश घाडगे (Suresh Ghadge) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या पासून फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांच्यापासून अनेक जण दूर गेले. शरद पवार यांचे एकनिष्ठ असणाऱ्या हसन मुश्रीफ यांनीही त्यांची साथ सोडली. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार राजेश पाटील हेही शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे अस्तित्वच धोक्यात आले, मात्र व्ही. बी. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आक्रमक काम करायला सुरुवात केली. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पुन्हा शरद पवार गटात आले.

चंदगड तालुक्यातील भाजपाचे नेते सुरेश घाडगे यांनी भाजपाला रामराम करीत शरद पवार यांचे नेतृत्व मानले आहे. त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बळकट करणार असल्याचे घाडगे यांनी सांगितलं आहे. घाडगे यांच्या प्रवेशामुळे चंदगड तालुक्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली हे निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT