NCP-BJP News : अजित पवार गटाचा बडा नेता म्हणतो, ‘मतदारसंघातील अवैध धंद्यांना पोलिसांचे संरक्षण’

Ajit Pawar Group`s leader says, police not lestening him-वडील प्रदेशाध्यक्ष, बहीण मंत्री असलेला आमदार म्हणतो, पोलीस निरीक्षक माझे ऐकतच नाहीत.
Aniket Tatkare
Aniket TatkareSarkarnama
Published on
Updated on

Aniket Tatkare News : माझ्या मतदारसंघातील पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना अनेकदा फोन करून अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या. मात्र ते पोलीस निरीक्षक ऐकत नाहीत. अवैध धंदे बंद करीत नाहीत. ते कोणाच्या दबावाखाली काम करतात, हे समजत नाही. (Police not take action against illigal business in the constituency)

सत्ताधारी भाजप (BJP) सरकारचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बडे प्रस्थ असलेले अनिकेत तटकरे म्हणतात पोलीस (Police) अवैध धंद्यांना संरक्षण देतात.

Aniket Tatkare
BJP Prasad Lad News: फडणवीसांच्या लाडक्या लाड यांनी गृहखात्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडलं!

नियम २६० अन्वये मांडलेल्या सरकारी (BJP) प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांनी चर्चा केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे बडे नेते व तालीका सदस्य अनिकेत तटकरे यांनी काल पोलीसांबाबत आपली व्यथा मांडली.

ते म्हणाले, मतदारसंघातील पोलीस ठाण्याचे निरीक्षक साबळे यांना मी फोन केला. मतदारसंघात अवैध धंदे सुरू आहेत, ते बंद करा असे सांगितले. मात्र त्यांनी त्यावर अंकुश न लावता कानाडोळा केला. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, हे कळत नाही. त्यांना शासनाने हटवावे.

Aniket Tatkare
Sanjay Raut यांचे Rahul Narwekar यांना चॅलेंज, बघा काय म्हणाले? | Shivsena | 16 MLA Disqualification

यावेळी सत्ताधारी पक्षाचे बडे प्रस्थ असलेल्या तटकरे यांनी स्वतः पोलीसांबाबतची आपली व्यथा मांडल्याने सदस्य देखील आश्चर्यचकीत झाले. यावेळी तटकरे यांनी बेपत्ता महिला, मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा केली.

ते पुढे म्हणाले, हुंडाबळीचे गुन्हे वाढत आहेत. पोलीसांकडे कलम ४९८ अन्वये गुन्हे दाखल होतात. त्यात तपासात खुप दिरंगाई होते. महिलांना न्याय मिळत नाही. कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यासाठी कालावधी निश्चित करावा. त्यासाठी पोलीसांचा स्वतंत्र सेल करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com