Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak: प्रशांत परिचारकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक 'तुतारी'फुंकणार

Vasantrao Deshmukh Will Join NCP Sharad Pawar Party: लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. बैठकीत तुतारी घेऊन निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur Political News: पंढरपुरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचे कट्टर समर्थक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

इंदापूरचे भाजपचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतानाच दुसरीकडे देशमुख हे शरद पवार गटात जाणार असल्याने पंढरपुरात भाजपला मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. 'तुतारी'घेऊन निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी बैठकीत मागणी केली. त्यानंतर देशमुखांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला.

वसंतराव देशमुख हे मागील चाळीस वर्षांपासून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पंढरपूर विधानसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवणार आहेत. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार आहेत. बैठकीत तुतारी कडून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

देशमुख हे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून विधानसभा लढवणार असल्याचे बोलले जाते. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन 'तुतारी' फुंकणार आहेत. मागील चाळीस वर्षांपासून भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक म्हणून वसंतराव देशमुख ओळखले जातात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT