Yajnavalkya Jichkar : अनिल देशमुखांच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा; दिवंगत माजी मंत्र्यांच्या सुपुत्राने ठोकला शड्डू

Katol Narkhed Assembly Constituency Yajnavalkya Jichkar Jichkar Will contest: कुठलीही आदळआपट, आरोप-प्रत्यारोप न करता जिचकारांचे मतदारसंघात काम सुरू आहे. सध्या तरुणांना सर्वाधिक भेडसावणाऱ्या रोजगारवर त्यांनी आपला फोकस केला आहे.
Yajnavalkya Shrikant Jichkar
Yajnavalkya Shrikant Jichkar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: माजी गृहमंत्री अनिल देशमुख दक्षिण-पश्चिम,आर्वी आणि मोर्शी या विधानसभा मतदारसंघात चाचपणी करीत असताना त्यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.

राज्याचे माजी अर्थमंत्री व याच मतदारसंघाचे लोकप्रितनिधी राहिलेले स्व.श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar) यांच्या नावासाठी येथून काँग्रेसने आग्रह धरला आहे. या जागेबाबत महाविकास आघाडीत तडजोड झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचेही संकेत स्थानिक कार्यकर्त्यांनी दिले आहे.

विद्याविभूषित,सुसंस्कृत श्रीकांत जिचकार यांच्या विषयी उभ्या महाराष्ट्राला आकर्षण होते. राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले होते. आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. काटोल-नरखेड मतदारसंघात जिचकार कुटुंबाविषयी सुप्त आकर्षण आहे. आता त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी याज्ञवल्क्य जिचकार समोर आले आहेत.

कुठलीही आदळआपट, आरोप-प्रत्यारोप न करता जिचकारांचे मतदारसंघात काम सुरू आहे. सध्या तरुणांना सर्वाधिक भेडसावणाऱ्या रोजगारवर त्यांनी आपला फोकस केला आहे. विविध मेळावे, बैठका घेऊन ते युवकांना मार्गदर्शन करीत आहेत. नोकऱ्यांच्या संधी त्यांच्यासाठी शोधत आहेत. महिला मेळाव्यांच्या माध्यमातून ते आपले व्हीजन मांडत आहेत. त्यांच्या मेळाव्यांना मोठा प्रतिसाद लाभत असल्याने काँग्रेसचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत.

Yajnavalkya Shrikant Jichkar
Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

श्रीकांत जिचकार १९८०मध्ये काटोलमधून निवडून आले होते. शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेमुळे कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले होते. यात जिचकारांचे नुकसान झाले. सुनील शिंदे नंतर १९९५च्या निवडणुकीत अनिल देशमुख विजयी झाले. २०१४च्या निवडणुकीचा अपवाद वगळता देशमुख हेच सुमारे पंचेवीस वर्षांपासून येथे लोकप्रतिनिधी आहेत.

देशमुख यांच्यामुळे आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) ताब्यात गेला. आता महाविकास आघाडीत असताना तो परत काँग्रेसकडे खेचून आणण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.

देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री आहेत. शरद पवार यांचे विश्वासू आहेत. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यानंतर ते पवार यांच्यासोबत राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी हा मतदसंघ सहजासहजी सोडेल असे दिसत नाही. सध्या अनिल देशमुखांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे. हे बघता याज्ञवल्क्य जिचकार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com