Jaykumar gore  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jaykumar Gore: मोठी बातमी! जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक

Jaykumar Gore allegations : भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

Jagdish Patil

Satara News, 21 Mar : भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.

या महिलेला 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा (Satara) स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरणी मिटवण्यासाठी या महिलेने तब्बल 3 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिलं आहे.

तर या महिलेला ही खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली असून पोलिसांकडून या महिलेची आता कसून तपासणी सुरू आहे. याच महिलेने मंत्री गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात गाजला होता. विरोधकांनी या प्रकरणी गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, आता आरोप करणाऱ्या महिलेनेच हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणी मागितल्याचं उघडकीस आलं आहे.

महिलेने काय केले होते आरोप?

भाजप मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले होते. या महिलेने राज्यपाल आणि विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची मागणी केली होती. मंत्री गोरे यांनी आपल्याला त्यांचे नग्न फोटो पाठवल्याचा दावा या महिलेने केला होता. तर हे प्रकरण 2019 साली मिटले होते. मात्र, गोरे मंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा या महिलेला त्रास द्यायला सुरू केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT