Chandrashekhar Bawankule, Sunil Katkar, Udayanraje Bhosale, Dhairyshil Kadam sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BJP News : खासदार उदयनराजे भोसले यांच्या विश्वासू समर्थकावर भाजपकडून मोठी जबाबदारी

Sunil Katkar सुनील काटकर हे खासदार उदयनराजे भोसले यांचे विश्वासू समर्थक असून त्यांना ग्रामविकास, सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास असून उत्कृष्ट संघटन कौशल्यही आहे.

Umesh Bambare-Patil

Satara BJP News : भारतीय जनता पक्षाच्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांचे विश्वासू समर्थक असलेले सुनील काटकर यांचा ग्रामविकास, सहकार क्षेत्रातील गाढा अभ्यास असून उत्कृष्ट संघटन कौशल्यही आहे. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद Satara Zilla Parishad भूषवले आहे. सभापतीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी उदयनराजेंच्या माध्यमातून विकासाचा झंझावात निर्माण केला होता.

उदयनराजे यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघात संघटन कौशल्याची जबाबदारी त्यांच्याकडेच असते. त्यांचे संघटन कौशल्य, प्रभावी जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संयोजकपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मुंबईत केली.

बावनकुळे यांच्या हस्ते काटकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यानिवडीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटकर यांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुशांत निंबाळकर, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, ॲड. शैलेश संकपाळ, अमोल सणस, ॲड.विनीत पाटील, ॲड.विकास पवार उपस्थित होते.

या नियुक्तीबद्दल राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे,नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, प्रदेश सचिव भरत पाटील, माजी आमदार दिलीप येळगांवकर, मदन भोसले, आनंदराव पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, डॉ. प्रियाताई शिंदे, महिला आघाडी अध्यक्षा सुरभी भोसले, युवक अध्यक्ष निलेश नलवडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT