Kolhapur News : पालकमंत्री पदाच्या नियुक्ती रखडल्यानंतर विरोधकांकडून सत्याधार्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अनेक राजकीय कांगावे करत विरोधकांनी महायुती सरकारला घेरले होते. अखेर पालकमंत्री पदाच्या निवडीनंतर विरोधकांसोबत सहकारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत मास्टर गेम खेळला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी इतर पक्षाला कंट्रोलमध्ये ठेवत पालकमंत्री पदाच्या नियुक्ती केलेल्या आहेत. शिवाय कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच सहपालकमंत्री पद देऊन शिवसेनेवर वचक ठेवली आहे. तर जिल्ह्यातील जेष्ठ आणि अनुभवी नेते असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिमची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय होण्यास मुश्रीफ यांना देखील मर्यादा येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्री यांच्यासोबत सहपालकमंत्री पदावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना नियुक्त केले आहे. या नियुक्त मागे शिंदेंच्या शिवसेनेवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरवर दावा केला असला तरी त्यांना वाशिमची जबाबदारी देऊन जिल्ह्यातील राजकारणावर असलेली पकड सैल करण्याचे काम भाजपने केलेले आहे. सुरुवातीला पालकमंत्री आबिटकर हे नवखे असल्याने त्यांना सह पालकमंत्री पद दिले की काय? अशी चर्चा होती. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप सह राष्ट्रवादीवर अंकुश ठेवण्याचे काम यानिमित्ताने भाजप करू शकते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे मित्र असलेले काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या मनसुब्याला देखील धक्का लावण्याचे काम भाजपने केले आहे. महाविकास आघाडी म्हणून सतेज पाटील यांचे आजच्या घडीला जिल्ह्याच्या राजकारणासह पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा रोल आहे. तर राज्य पातळीवरील नेतृत्व गुण मिळाल्याने भाजपलाही पाटील यांची भीती आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता न आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ही अपयश मिळेल. असा समज या निमित्ताने भाजपने देखील ठेवलेला नाही. जिल्हाभर पाटील यांचे जाळे असल्याने शिवाय पालकमंत्री मुश्रीफ यांना निवड केली तर त्याचा फायदा पाटील यांना देखील होऊ शकतो. असा राजकीय कयास बांधून मुश्रीफ यांना वाशिमला धाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विरोधकांना देखील कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम सह पालकमंत्री पदा या नात्याने भाजप करणार आहे.
याशिवाय शिवसेनेचे एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सहा आमदार आणि दोन खासदार असल्याने पुन्हा शिवसेनेची व्याप्ती या विधानसभा निवडणुकीत वाढल्याचे चित्र आहे. भाजपला देखील कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटन करायचे आहे. शिवसेनेच्या निमित्ताने भाजपच्या या मनसूब्याला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 ला भाजपचे दोन आमदार पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भोपळा ही फोडता आला नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभेत भाजपला पुन्हा यश मिळाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांचे संख्याबळ वाढवण्यासाठी भाजप बूथ लेवलवर काम करत आहे. शिवाय महाडिक गटाचे बळ मिळाल्याने भाजप जिल्ह्यात आपले प्रस्थ वाढवून पाहत आहे. एकंदरीतच पाहता मुश्रीफ यांना जिल्ह्याबाहेर पाठवून त्यांना व्यस्त ठेवण्याचे काम या निमित्ताने भाजपने केले आहे. तर सह पालकमंत्री पद देऊन आबिटकर कर यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम भाजपने केले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात उघड उघड प्रचार केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांची सतेज पाटील यांच्याबाबतची नाराजी कायम आहे. मुश्रीफ यांना पालकमंत्री पद देण्याऐवजी आबिटकर यांना पालकमंत्री पद देऊन सतेज पाटील यांच्या फोरम मध्ये आंबेडकर जास्त जाणार नाहीत याची काळजी देखील भाजपने घेतलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.