Guardian Ministers Controversy : नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडेच राहणार, एकनाथ शिंदेचा रुसवा CM फडणवीस काढणार नाहीत?

Nashik Guardian Ministers Controversy Girish Mahajan : 26 जानेवारीला पालकमंत्री म्हणून घोषित झालेले गिरीश महाजन हेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालायात ध्वजारोहन करतील.
Girish Mahajan, Devendra Fadnavis
Girish Mahajan, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Guardian Ministers Controversy : पालकमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी गेल्याने या चर्चांना अधिक जोर आला. शिंदे यांनी स्वतः पुढे येत आपण नाराज नसल्याचे सांगितले मात्र पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवली तर त्यात चूक काय? असे म्हटले. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिंदे रुसल्याचे सांगितले जात आहे.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मात्र, 26 जानेवारीला पालकमंत्री म्हणून घोषित झालेले गिरीश महाजन हेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालायात ध्वजारोहन करतील. तर, रायगडचे ध्वजारोहन आदिती तटकरे करणार आहेत.

Girish Mahajan, Devendra Fadnavis
Dada Bhuse Politics: दादा भुसे यांनी घेतला अद्वय हिरे यांचा "इझी कॅच", हिरे सत्तेतून बेदखल!

नाशिकचे पालकमंत्रिपद आपल्याकडे राहावे, यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत भाजपच्या गोटातून दिले जात आहेत. गिरीश महाजन यांनाच नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजप ठाम आहे. पालकमंत्रिपदाबाबत गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे.

पालकमंत्रिपदाचा वाद दिल्ली दरबारी?

पालकमंत्रिपदाबाबतचा वाद दिल्ली दरबारी पोहोचली आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून नाराजी असल्याने नियुक्तीनंतर अवघ्या 24 तासांत या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीला स्थगिती दिली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रुसवा दूर न करता नाशिकच्या पालकमंत्रिपदी महाजन यांना कायम ठेवणार असल्याच्या चर्चा आहेत.

Girish Mahajan, Devendra Fadnavis
Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत केजरीवालांच्या पराभवासाठी मोठा प्लॅन; अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच झालं उघड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com