prithviraj Chavan, Atul bhosle  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politics : पृथ्वीराज चव्हाणांना दुसरा धक्का देण्यासाठी अतुल भोसलेंची फिल्डिंग; यंत्रणा लागली कामाला

prithviraj Chavan, Atul bhosle : विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन भाजप नेते अतुल भोसले जायंट किलर ठरले. आता चव्हाण यांना दुसरा धक्का देण्यासाठी भोसले यांनी तयारी सुरु केली आहे.

Hrishikesh Nalagune

Karad Politics : विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन भाजप नेते अतुल भोसले जायंट किलर ठरले. आता चव्हाण यांना दुसरा धक्का देण्यासाठी भोसले यांनी तयारी सुरु केली आहे. मलकापूर नगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नगरपालिकेतील काँग्रेसकडील सत्ता मिळवण्यासाठी भाजप सरसावली आहे. यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

मलकापूर पालिकेत गेली अनेक वर्षे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची सत्ता होती. पण मुदत संपल्याने आणि निवडणूक लांबल्याने पालिकेत सध्या प्रशासक राज आहे. ही निवडणूक जाहीर होताच पालिका काँग्रेसकडून ताब्यात घेण्यासाठी भाजप उत्सुक आहे. त्यासाठी अतुल भोसले यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यातूनच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या हाती कमळ देण्याचा सपाटाच सुरु आहे.

भोसले यांनी शिंदे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र यादव यांना भाजपच्या गोटात घेतलं आहे. हा धक्का पचवत असतानाच काँग्रेसच्या गोटातील चांदे काका-पुतण्यांनाही भोसले यांनी भाजपवासी केले. यामुळे मनोहर शिंदे आणि त्यांचा गटाला हादरे बसू लागले आहेत. त्यांनीही आता गळती थोपवण्याचे प्रयत्न सुरू केले असून, निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मलकापूरचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे.

विधानसभेला पराभव झाला असला तरीही, आपल्या काळात झालेली विकासकामे, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि आमदार असताना त्यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे, त्यातून नागरिकांची झालेली सोय हा अजेंडा घेऊन सोबत घेऊन मनोहर शिंदे यांनी पुढे जाण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यांना गेल्या निवडणुकीवेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटाने साथ केली होती. पण काही दिवसातच त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार असल्याने यावेळी ते महायुतीसोबत असण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मलकापूर पालिकेतील सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात जाणार, की काँग्रेसच्या हातात राहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT