
BJP vs Congress : भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडच्या दौऱ्यावर आहेत. महायुतीचे प्रमुख नेतेही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी भोजनाला जाणार आहेत. याची राजकीय चर्चाही सुरू झाली आहे.
या भेटीत महायुतीच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असले याचा अंदाज बांधले जात आहेत. या भेटीगाठीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांना महायुतीला जोरदार टोला लागावला.
आता सध्या राजकीय चर्चा व्हावी, अशी काही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. आता केवळ एकच परिस्थिती आहे. ती म्हणजे एकमेकांच्या फाईली अडवा, एकमेकांच्या विभागांची जिरवा, लोकांना परेशान करा. हा एकमेव धंदा सध्या जोरात सुरू आहे. अमित शाह आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांच्या भेटीत आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची अडवू नका आणि तुमची जिरवणार नाही, तुम्ही जिरवू नका, अशी चर्चा बहुतेक झाली असेल असाही टोला वडेट्टीवारांना लगावला.
अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्रात आले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर ते जात असल्याने या दौऱ्याची मोठी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे.
त्यापाठोपाठ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे नमन करणे हे आता भाजपला उत्तम जमते, असे सांगून आशीर्वाद मिळाला की महाराजांना विसरू नये म्हणजे झाले, असा खोचक टोला भाजपला लगावला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारिता छावा चित्रपटानंतर राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेणारे इतिहासकार इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरने धमक्या दिल्या. सोबतच छत्रपतींचाही अपमान केला. या सर्व प्रकरणात भाजपलाही घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपतींच्या विरोधात कोणी कारस्थाने रचले याचे दाखले दिले गेले. या सर्व पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा रायगड दौरा आणि ‘चलो चले मोदी के साथ छत्रपतीं का आशीर्वाद' या भाजपच्या घोषणेवर वडेट्टीवारांनी निशाणा साधला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.