Congress Leader Balasaheb Thorat
Congress Leader Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ओबीसी आरक्षणाबाबत भाजप वेगळा निर्णय घेऊ शकेल

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यात मागील महिन्याभरात मोठ्या राजकीय हालचाली झाल्या आहेत. राज्यातील शिवसेनेची भूमिका, ओबीसींचे राजकीय आरक्षण व औरंगाबादचे नामांतरण यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी आपली मते मांडली. ( BJP can make a different decision on OBC reservation )

राज्यातील शिवसेना आमदारांबरोबरच खासदारही भाजपच्या संपर्कात आले आहेत. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेना वेगळा निर्णय करते का याबाबत अद्याप आम्हाला माहीत नाही. कायद्याची लढाई सुरू आहे. लोकशाही जे अभिप्रेत आहे तसा निर्णय आम्हाला अभिप्रेत आहे. योग्य निर्णय सर्वोच्च न्यायालय करेल अपेक्षा आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील नगरपालिकांची निवडणूक जाहीर करण्यावर त्यांनी सांगितले की, नगरपालिका निवडणूक घोषित झाली आहे. यात बदल होईल अस मला वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी अहवाल दाखल झाला आहे. न्यायालयाने काही निर्णय दिला तर सरकार म्हणून निर्णय होत असता. भाजप वेगळा निर्णय घेऊ शकेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

औरंगाबादच्या नामांतरावर ते म्हणाले की, औरंगाबाद नामांतर विषय अचानक आला. संभाजी महाराज श्रद्धेच स्थान आहे. विषय अचानक आला. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल यावर चर्चा करू पण चर्चा झाली नाही. तो निर्णय झाला तेव्हा झालं ही वस्तुस्थिती आहे. किमान समान कार्यक्रमात हा विषय नव्हता. अचानक हा विषय आता आला. हा विषय घ्यायची आवश्यकता नाही तरी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले. याला धार्मिक रंग देवू नये या मताचे आम्ही आहोत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT