बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही कायदेशीर लढाईसाठी सज्ज

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना या बैठकी विषयी माहिती दिली.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

मुंबई - राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसने आज वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना या बैठकी विषयी माहिती दिली. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. ( Balasaheb Thorat said, we are ready for a legal battle )

बाळासाहेब थोरात म्हणाले, "राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात काँग्रेसची आज बैठक झाली. यात राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत. शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरु आहे."

Balasaheb Thorat
काँग्रेसचे पाच आमदार नॅाट रिचेबल; बाळासाहेब थोरात म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडी स्थापना करताना जी लिगल टिम कार्यरत होती ती परिस्थिती वर बारीक लक्ष ठेऊन आहे आणि आम्ही कायदेशीर लढाईसाठी सज्ज आहोत. आमच्याशी ते संपर्कात आहेत. राष्ट्रपती राजवट लावण्याचे कोणतेही कारण सध्या दिसत नाही, राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही. महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत काय करायचे याचा मुख्यमंत्री निर्णय घेतील," असे त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat
डॉ. शंकरराव चव्हाण 'जलनायक' माहितीपट लवकरच ; अशोक चव्हाणांची घोषणा

अशोक चव्हाण म्हणाले की, "कोणी कुणाच्या नावाने गट तयार केला तरी जोपर्यंत अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com