Vishal Patil And Chandrakant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : अपक्ष खासदारांच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या बैठकीत मिठाचा खडा? पण नेत्यांच्या उत्तराने भडकलेला नगरसेवकही नरमला

Sangli Congress Politics : सांगलीच्या राजकारणात सध्या अपक्ष खासदार विशाल पाटील चर्चेत असून त्यांना भाजप नेते तथा मंत्री चंद्राकांत पाटील यांनी ऑफर दिली आहे. आता याच ऑफरमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : भाजप मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष खासदार विशाल पाटील यांना ऑफर दिली होती. त्या ऑफरला पाटील यांनी नकार देत हा विषय थांबवला होता. पण आता याच ऑफरवरून काँग्रेसच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर येत असून काँग्रेसमध्येच यावरून मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून काँग्रेसला पाठिंबा दिलेले अपक्ष खासदार विशाल पाटील काँग्रेसला सोडणार आणि भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. तर एक नाही तर तब्बल दोन ते तीन वेळी चंद्रकांतदादांनी त्यांना भाजपची ऑफर दिली आहे. तसेच त्यांना ही ऑफर आपण कायम देत राहू. ते एक चांगले व्यक्त असून राजकारणातील अशा व्यक्तिंनी भाजपमध्ये असायला हवं असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यामुळे विशाल पाटील यांच्याबद्दल आता काँग्रेसमध्ये नाराजीसह शंका निर्माण केली जातेय.

याचाच प्रत्यक्ष सांगलीत आयोजित काँग्रेसच्या बैठकीत आला. जिल्ह्याचे निरीक्षक, माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी सोपवलेल्या जबाबदारी प्रमाणे जिल्ह्यात बैठका घेवून काँग्रेसमधील मते जाणून घेतली आहेत. त्याप्रमाणे पक्ष बांधणी करण्यासाठी आता काँग्रेसने बूथपासून प्रदेश पातळीपर्यंत बदल केले जातील असे संकेत दिले. तसेच त्यांनी नेत्याचे पाहुणे, वशिल्याने आलेले आता बाजूला केले जातील. ज्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनाच पद दिले जाईल. काँग्रेस सर्वच पातळीवर नवीन सैन्यभरती आगामी राजकीय लढाईसाठी तयारीने उतरेलं असेही म्हटलं आहे.

काँग्रेस कमिटीत बैठक नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि संघटनात्मत बदलांच्याबाबत नियोजन करण्यासाठी होती. पण खासदार विशाल पाटील यांच्या मुद्द्यासह बैठकीचे आमंत्रण न दिल्यावरून जोरदार वादंग झाला. पण मिरज शरह अध्यक्ष आणि माजी नगर सेवक संजय मेंढे यांनी यावरून जोरदार वाद घातला. यावेळी जोरदार वाद प्रतिवाद पाहायला मिळाला.

माजी नगर सेवक संजय मेंढे यांनी आपल्याला आढावा बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नाही, असे म्हणत वादाला सुरूवात केली. यावरून वाद चिघळल्यानंतर मेंढे यांनी पलटवार करताना मिरज शहर अध्यक्षांनी केलेल्या विशाल पाटलांच्या प्रचाराचा मुद्द्यात हात घातला. तर मिरज शहराचे अध्यक्ष असतानाही सांगलीत अपक्षांच्या प्रचारात कसे होता? असा सवाल केला. यामुळे काँग्रेस बैठकीत विशाल पाटलांच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापलं होतं.

यावेळी उपस्थित असणाऱ्या अन्य पदाधिकारी आणि माजी आमदार रामहरी रूपनवर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले. यावेळी खासदार विशाल पाटील काँग्रेससोबत आहेत, ते काँग्रेसचे शंभरावे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, असे म्हणत विशाल पाटील काँग्रेसमध्येच असल्यावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

पण सध्या सुरू असलेल्या भाजपच्या ऑफर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय वक्तव्यांमुळे जिल्ह्यात काँग्रेसह विरोधकांच्यातही खासदार विशाल पाटील यांच्याबाबच चर्चांना उत आला आहे. ज्यामुळे आता काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT