Vishal Patil : विशाल पाटलांच्या मुखी काँग्रेसपेक्षा भाजपचाच जप; तरी म्हणतात, 'मी कोसो...'

MP Vishal Patil On BJP : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपबद्दल वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
MP Vishal Patil On BJP
MP Vishal Patil On BJP
Published on
Updated on

Sangli News : सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील सध्या चांगलेच चर्चेत असून नुकताच त्यांनी, भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन, मलाही मंत्रिपद मिळेल, असं वक्तव्य केलं होतं. तर यामागे त्यांना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची दिलेली ऑफर असल्याचे बोलले जात होते. यावरून राज्यभर चर्चेची राळ उठल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नवे वक्तव्य केलं आहे. विशाल पाटील यांनी, अपक्ष म्हणून निवडून आलो आहे आणि पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार आहे, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. यामुळे सध्यातरी काँग्रेसची चिंता मिटली असून विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला विराम मिळणार आहे. ते पारे येथे ग्रामदैवत दरगोबा यात्रेनिमित्त गेले असताना बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाचे खुले निमंत्रण दिले होते. तसेच राजकीय विकासासाठी अद्याप भरपूर वेळ असून भाजपमध्ये आल्यास रखडलेली कामे पार पडतील असाही सल्ला दिला होता. त्यानंतरच विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर चढला होता.

तोच विशाल पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित सांगलीतील डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले होते. या वेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उदाहरण देताना, विशाल पाटील यांनी, गोरे सांगलीचे जावई असून ते आदी अपक्ष म्हणून आमदार झाले. मी ही प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. त्यामुळे भविष्यात मी ही काँग्रेस सोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात दिसेनं. मलाही गोरेंप्रमाणे मंत्रिपद भेटले, असे वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.

MP Vishal Patil On BJP
Vishal Patil : देवेंद्र फडणवीसांच्या काळातील पाटबंधारे टेंडरवर खासदार विशाल पाटलांना संशय, पडळकरांवरही साधला निशाणा

या पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांनी, आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून पुढची पाच वर्षे अपक्ष म्हणूनच राहणार आहे. मी भाजपच्या विचारसरणीपासून कोसो दूर असून माझी विचारसरणी भाजपच्या विचारधारेकडे कधी वळेन, असे वाटत नाही. मात्र पुढची पाच वर्षे अशा प्रकारच्या चर्चा चालूच राहणार. त्याला काही इलाज नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

MP Vishal Patil On BJP
Vishal Patil : सांगलीचं राजकारण फिरणार; खासदार पाटलांच्या 'विशाल' हृदयात काँग्रेस नव्हे तर शिवसेना? ही जवळीक तह की पार्टनरशीप?

गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी मी पारे येथे आलो होतो. त्यावेळी येथील लोकांनी मला ग्रामस्थांनी जागृत देवस्थान असल्याचे सांगितलं होतं. उज्जैनच्या महांकाळेश्वरचे हे रूप आहे. मी दर्शनाला यावं, अशी दर्गोबाचीच इच्छा होती. गेल्या वेळी मी आलो, त्यावेळी लोकसभेची निवडणूक व्हायची होती. मला त्या निवडणुकीत मोठे यश मिळालं. त्यामुळे लाखो भाविकांच्या बरोबर मी आता खासदार म्हणून आलो आहे. या भागावर स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांचे विशेष लक्ष होते. त्यांनी मोठी काम या भागात केली आहेत. राजकीय मतं, विचार जरी वेगळे असले, तरी मी पुढच्या काळात पारे आणि परिसराच्या विकासासंदर्भात काही विशेष गोष्टी करणार असून ते लवकरच पाहायला मिळतील असेही विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com