Satara BJP News : संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन त्यांचा अवमान केला. याचा सातारा जिल्हा भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. सांविधानिक पदावरील व्यक्तींचा अपमान करणाऱ्यांना संसदेतून कायमचे बडतर्फ करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी Kalyan Banerjee हे देशाचे उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री करुन त्यांचा अवमान केला. त्यावेळी काँगेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi हे त्याचे चित्रण करीत होते. ही बाब संविधानाला गुंडाळून ठेवण्यासारखी आहे. याचा सातारा जिल्हा भाजपच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
धैर्यशीलदादा कदम म्हणाले, खासदार पदावर असणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीने सांविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबाबत असे वर्तन करणे हे लोकशाहीचा आणि समस्त भारतीयांचा अपमान करण्यासारखे आहे. याबाबत कडक कायदे करून सांविधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान करणाऱ्यास कायमचे बडतर्फ करावे आणि त्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी धैर्यशील कदम यांनी केली.
या मागणीचे निवेदने जिल्हा भाजपच्यावतीने कारवाईसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडे पाठवली आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्यात आले. साताऱ्यातील आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, लोकसभा समन्वयक सुनीलतात्या काटकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, निलेश नलावडे, मनीषा पांडे, राहुल शिवनामे, बाळासाहेब गोसावी, डॉ.सचिन साळुंखे, डॉ.उत्कर्ष रेपाळ,रवींद्र आपटे, अमित भिसे, विकास बनकर, किशोर गोडबोले, विक्रांत भोसले, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.