Dr. Anil Bhonde, Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anil Bhonde - Rohit Pawar Tweet War : भिडें मागचा बोलविता धनी भाजपच ! रोहित पवारांचे एक घाव दोन तुकडे

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या संपताना दिसत नाही. महात्मा गांधींवरील केलेल्या विधानामुळे भिडेंविरोधात राज्यातील विरोधकांसह विविध पुरोगामी संघटनांनी टीकेची झोड उठवली जात आहे.

भिडे यांचा भाजपशी कसलाही संबंध नसल्याचे सांगून भाजप वरिष्ठांनी हात झटकले असले, तरी भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी मात्र, भिडेंची पाठराखण केली आहे. भाजपकडून भिडेंबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)आमदार रोहित पवारांनी 'भिडेंच्या आडून भाजप मोठा कट शिजवत असल्याचा', गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी संभाजी भिडे अथवा अनिल बोंडे यांचे थेट नाव न घेता एक ट्विट केले आहे., "राज्यातील एक व्यक्ती कित्येक दिवसांपासून सुरवातीला महिला भगिनींबाबत, त्यानंतर महात्मा फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्याबाबत आणि आता जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांविषयी उघडपणे गरळ ओकत असताना सरकार मात्र, काहीही कारवाई करत नाही. उलट या दुष्प्रवृत्तीला रोखण्याऐवजी एक भाजप खासदार उघडपणे त्याची बाजू घेतो..." असा आरोप भाजपवर केला आहे.

"यावरून आजच्या ज्वलंत प्रश्नावरून इतरत्र लक्ष वळवण्यासाठी भाजपनेच रचलेला हा कट असल्याचं सामान्य लोकांचं मत आहे. पण हे असंच चालू राहिलं आणि लोकांनी कायदा हातात घेतला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल." असा भाजपवर गंभीर आरोप करत एक प्रकारे सरकारला इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते खासदार अनिल बोंडे..

भिडे गुरुजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही, मात्र एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे डॉ.अनिल बोंडे म्‍हणाले होते. यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींना हरामखोर, नालायक असे म्हटले आहे. यशोमती ठाकूर यांना भिडे गुरुजींवर अशा शब्दात बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा, अशी मागणी बोंडे यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT