Shridevi Fulare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP corporator : भाजप नगरसेविकेने शाळेसाठी आरक्षित जागेवर बांधले घर : सोलापुरात खळबळ,महापालिका प्रशासनाकडून चौकशी सुरू

Solapur Corporation Land Scam : सोलापूर महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित जागेवर भाजपच्या नगरसेविकेने घर बांधल्याचे पाहणीत समोर आले. प्रकरणाची महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, शहरात राजकीय आणि प्रशासकीय चर्चा रंगली.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 25 August (प्रमिला चोरगी) : भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेने महापालिकेच्या जागेवर घराचे बांधकाम केले असल्याचे प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. विशेष म्हणजे ही जागा महापालिका शाळेसाठी आरक्षित होती, या प्रकारामुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासानाने आता या घराची चौकशी सुरू केली आहे.

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग १५ अ मधून श्रीदेवी फुलारे ह्या भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या आहेत. फुलारे यांनी आपल्या घराचे बांधकाम हे सोलापूर महापालिकेच्या जागेत केल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये पुढे आले आहे. आता या घरासाठी बांधकाम परवाना कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला गेला, वापर परवाना आहे का? मिळकत कराकडे नोंद कोणत्या पद्धतीची आहे, याची संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.

महापालिका शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी घराचे बांधकाम केले आहे. जागेची प्रत्यक्ष पाहणी, मोजणी व कागदपत्रांची तपासणी करून अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी प्रभागातील नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन केले होते.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिका भूमी व मालमत्ता विभागाने जागेची प्रत्यक्ष पाहणी, मोजणी व कागदपत्रांची तपासणी करून अहवाल तयार केला. तपासणीमध्ये प्रथमदर्शनी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचे घर महापालिकेच्या जागेवर असल्याचे निदर्शनास आले आहे.

नगरसेविकेच्या घराच्या बांधकामाला महापालिकेची परवानगी आहे का, असेल तर २०१२ पासून वापरात असलेल्या घराला वापर परवाना घेतला आहे का, तो कोणत्या कागदपत्रांच्या आधारे दिला गेला आहे? सध्या नगरसेविका यांच्या घराला कर आकारणी किती आहे? याची सर्व माहिती संबंधित विभागाकडून मागविण्यात येत आहे. त्यामुळे भूमी व मालमत्ता विभागाने जागेची प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल नगररचना व बांधकाम विभागाकडे पाठवून दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

...तर मी नगरसेवकपदाचा राजीमाना देईन : श्रीदेवी फुलारे

दरम्यान, याबाबत नगरसेविका श्रीदेवी फुलारे म्हणाल्या, माझ्या नावावर कोणतीही जमीन नाही, त्यामुळे माझे घर अनधिकृत असण्याचा प्रश्नच येत नाही. मी लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करत आहे. पण काही लोक राजकीय द्वेषापोटी आरोप करत आहेत. मला अजून कोणतीही नोटीस आलेले नाही. नोटीस आल्यानंतर त्यावर उत्तर देईन. माझ्या नावाची एक जरी पावती निघाली तर मी नगरसेवकपदाचा राजीमाना देईन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT