Mohite Patil : मोहिते पाटलांच्या भूमिकेवर ठरणार सोलापूर डीसीसीच्या निवडणुकीची चुरस; विजयदादांच्या जागेवर येणार रणजितदादा...

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजपसोबत समेट झाल्यास बँकेचे संचालक मंडळ बिनविरोध होण्याचीही शक्यता आहे.
Shankarrao Mohite Patil-Pratapsinh Mohite Patil-Ranjitsinh Mohite Patil-Vijaysinh Mohite Patil
Shankarrao Mohite Patil-Pratapsinh Mohite Patil-Ranjitsinh Mohite Patil-Vijaysinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 August : सोलापूरच्या राजकारणात मागील काही निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असा संघर्ष दिसून आला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांची बार्गेनिंग पॉवर किती आणि काय असणार, भाजपच्या पॅनेलमध्ये मोहिते-पाटील असणार का?, याच्या उत्तरात डीसीसीच्या निवडणुकीची चुरस दडलेली आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार मोहिते-पाटील यांची ‘डीसीसी’बाबत काय भूमिका असणार, यावर निवडणुकीतील चुरस अवलंबून आहे. भाजप आणि मोहिते-पाटील यांच्यात समेट झाल्यास नवे संचालक मंडळ बिनविरोधही होऊ शकते.

माळशिरस सोसायटी मतदारसंघातून सहकार महर्षी (स्व.) शंकरारव मोहिते-पाटील यांच्यानंतर १९७९ पासून २०१८ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे तब्बल ३९ वर्षे संचालक होते. डीसीसीमधील ही सर्वांत मोठी इनिंग मानली जाते. माळशिरस तालुक्यात १४५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी असून, मतदानासाठी १४१ संस्था पात्र आहेत. त्यापैकी साधारण १०० संस्था सध्या मोहिते-पाटलांच्या ताब्यात आहेत.

आगामी निवडणुकीसाठी माळशिरस सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार? याबद्दलही उत्सुकता आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघातून डीसीसीत येऊ शकतात. या शिवाय डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था व दुग्ध संस्था या दोन मतदारसंघात मोहिते पाटलांकडे सध्या निर्णायक संख्याबळ आहे. डीसीसीच्या तीन जागांवर त्यांचा आजही निर्विवाद प्रभाव कायम आहे.

मोहिते-पाटील कुटुंबातून (स्व.) शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री (स्व.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी संचालक म्हणून काम पाहिले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा डीसीसी प्रवेश २००५ मध्ये झाला. त्यांनी २००५ ते २०१० आणि २०१० ते २०१५ दरम्यान खरेदी-विक्री मतदारसंघातून, तर २०१५ ते २०१८ दरम्यान पणन संस्था/शेतीमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Shankarrao Mohite Patil-Pratapsinh Mohite Patil-Ranjitsinh Mohite Patil-Vijaysinh Mohite Patil
Raju shetti : राजू शेट्टी धावले रामराजेंच्या मदतीला : मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप, ‘श्रीराम’बंद पाडण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न

प्रतापसिंहांचा राजीनामा

(स्व.) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी २००५ ते २०१० आणि २०१०-२०१३ मध्ये पणन व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद न मिळाल्याने त्यांनी २०१३ मध्ये टर्म पूर्ण होण्यापूर्वीच संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

राम सातपुते डीसीसीसाठीही पॅड बांधून तयार...

माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील यांच्या विरोधात लढणारे माजी आमदार राम सातपुते हे देखील डीसीसीच्या संचालकपदासाठी इच्छूक दिसत आहेत. डीसीसी बँकेवर आता भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. माळशिरसच्या सोससायटी मतदारसंघातून डीसीसीवर येणे शक्य नसल्याने माजी आमदार सातपुते यांनी अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघासाठी आवश्‍यक ती तयारी पूर्ण केली आहे.

नातेपुते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे ते सभासद आणि संचालक आहेत. त्यांनी या सोसायटीतून कर्ज घेऊन कर्जाची परतफेडही केली आहे. डीसीसीचे संचालक होण्यासाठी आवश्‍यक असलेले सर्व निकष सध्या सातपुते यांनी पूर्ण केले आहेत. भाजपच्या पॅनेलमध्ये संधी मिळेल, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना आहे.

Shankarrao Mohite Patil-Pratapsinh Mohite Patil-Ranjitsinh Mohite Patil-Vijaysinh Mohite Patil
BJP MLA daughter : भाजप आमदाराच्या लेकीने PSI सविता पाटील यांच्या कानशिलात लगावली; पोलिसी खाक्या दाखवताच वडील झुकले...

पाच मतदारसंघात मातब्बरांपुढे चॅलेंज नाही...

बँकेच्या सोसायटी मतदारसंघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला, बार्शी, करमाळा आणि माळशिरस या मतदारसंघावर सध्या नव्या समीकरणांचा प्रभाव आहे. या सहा मतदारसंघाला संघर्षाची किनार आहे. मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील, उत्तर सोलापूरमध्ये माजी आमदार दिलीप माने, माढ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे, पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक, मंगळवेढ्यात माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांचे आजही वर्चस्व कायम आहे, त्यामुळे या तालुक्यांमध्ये नव्या समीकरणांचाही फारसा काही परिणाम सध्या दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com