Sangali Crime news: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Crime news: धक्कादायक! सांगलीत भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या..

मुलांना शाळेतून आणण्यासाठी विजय ताड शाळेत निघाले होते. पण..

सरकारनामा ब्युरो

Sangali Crime News : सांगली (Sangali) जिल्ह्यातील जतमधून (Jat) धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक ताड हे आपल्या चारचाकी गाडीतून सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल येथे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. स्कूलच्याजवळ पोहोचले असता काही अज्ञात हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत तिथे पोहचले, त्यांनी ताड यांची इनोव्हा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.या हल्ल्या ते जागीच ठार झाले.

काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची इनोव्हा गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला. पण हा हल्ला नेमका कोणी आणि का केला हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर ताड यांच्या समर्थकांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. तर सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली हेदेखील जतमध्ये दाखल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT