Bjp Leader  Sarakrnama
पश्चिम महाराष्ट्र

Bjp News : भाजपच्या शिष्टमंडळाकडून समरजितसिंह घाटगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीकडून तयारी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच कोल्हापुरात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सावध झालेल्या महायुतीने फुटीच्या उंबरठयावर असलेल्या समरजितसिंह घाटगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

बुधवारी रात्री उशिरा भाजपचे (Bjp ) राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhanjy Mahdaik), माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह अन्य भाजपचे इतर नेते समरजितसिंह घाटगे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करीत आहेत. (Bjp News)

समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णय घेतला आहे. या घेतलेल्या निर्णयासंदर्भात भाजप नेत्यांची घाटगे यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांची समजूत काढून उद्या होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

घाटगे यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजप नेते महेश जाधव यांचा समावेश होता. दरम्यान, यावेळी घाटगे यांच्याकडून कसलाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते.

'मला जनतेमधून आमदार व्हायचंय'

गेली दहा वर्षे मी सामाजिक कार्यात आहे. अपक्ष म्हणून मी एकवेळ निवडणूक लढवली आहे. पण मी कुठेतरी कमी पडतो आहे. भाजपची अडचण मी समजू शकतो. मला त्यांच्याकडून कोणतेही अपेक्षा नाही. मला जनतेमधून आमदार व्हायचे आहे. त्यामुळे मी एका पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवणार असल्याचे भाजप शिष्टमंडळाला घाटगे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT