Badlapur News, 21 August : बदलापूर शहरातील एका शाळेत चार वर्षीय 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बदलापूरमधील (Badlapur) लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तर मंगळवारी बदलापुरातील संतप्त नागरिकांनी आंदोलन करत मध्य रेल्वे रुळावर ठिय्या मांडून रेल्वेची वाहतूक दिवसभर बंद पाडली होती. आरोपीला फाशी द्या ही एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली होती.
त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (SIT) करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवाय आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासनही सरकारकडून देण्यात आलं होत. अशातच आज सकाळी आरोपी अक्षय शिंदे (Accused Akshay Shinde) याा कल्याण न्यायालयात हजर केलं होतं.
यावेळी सरकारी वकील अश्विनी भामरे यांनी युक्तीवाद केला. तर सदर पुरावे आणि त्याचा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीची कोठडी मागून घेतली आहे. त्यानुसार आता 26 ऑगस्टपर्यंत आरोपी पोलिस (Police) कोठडीत असणार आहे. तर वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात एसआयटी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.