Mahayuti Politics Over Kolhapur municipal corporation elections; Devendra Fadnavis, Ajit Pawar And Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Politics : कोल्हापुरात महायुतीने विषय केला हार्ड, राज्यात पहिली घोषणा, 'या' फॉर्म्युलावर लढणार

BJP Dhananjay Mahadik On Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेसाठी अखेर महायुतीची घोषणा झाली असून राज्यात पहिली युतीची घोषणा कोल्हापूर महापालिकेसाठी झाली आहे.

Rahul Gadkar

  1. चार दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीचा तिढा सुटला.

  2. भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर निवडणूक लढवणार.

  3. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा केली.

कोल्हापूर: राहुल गडकर

चार दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीत महायुतीचे जागावाटप आणि उमेदवारीबाबतचा तिढा आज सुटला. अखेर कोल्हापूर महापालिकेत महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा महायुतीतील सर्व नेत्यांनी केली. त्यामुळे अनेक दिवस जीव मुठीत घेऊन बसलेल्या इच्छुकांचा जीव अखेर भांड्यात पडला. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजप 36 शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार असल्याची घोषणा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. आज त्या संदर्भात पत्रकार परिषद झाली.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सत्यजित उर्फ नाना कदम, महेश जाधव आणि विजय जाधव हे देखील उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेसाठी आणि राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी युती होत आहे. महायुतीच्या सर्व नेत्यांनी मोठ मन करून एक पाऊल मागे पुढे येऊन सहकार्य केले. भाजप 36, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा खासदार महाडिक यांनी केली.

जिंकून येणाऱ्या जागेवर उमेदवारी देण्यात आली असून कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे. काही जणांना उमेदवारी मिळाली नाही त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करत आहोत, पण विकासाचे व्हिजन घेऊन महापालिकेच्या रिंगणात उतरलो असल्याचे महाडिक म्हणाले.

विरोधकांनी घोषणा केली, कोल्हापुर कस? तुम्ही म्हणशीला तसं. पण प्रत्येक वेळी टॅगलाइन लाऊन कोल्हापूरकरांना फसवायचं त्यांनी ठरवले आहे. कोल्हापूर कसं? थेट पाईप लाइन अन् पाण्याची बोंब झाली तशी, कोल्हापूर कसं? रस्ते खड्ड्यात गेले तसं, कोल्हापूर कसं? आय टी पार्कची बोंब उडाली तसं. पण आता या लोकांना जनता विचारत घेणार नाहीत. पण आता चौफेर विकासाचा दृष्टिकोन घेऊन महायुती हा महापालिकेला जाणार आहोत, असेही महाडिक म्हणाले.

जागावाटप संदर्भात मॅरेथॉन बैठक झाल्या. तगडी महायुती आम्ही दिले आहे. कोल्हापूरचा विकास घेऊन आम्ही समोर येत आहोत. विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खासदार, आमदार, मंत्री महायुतीचे आहेत, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

दहा वर्षांनी निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यातून 81 उमेदवार देण्यासाठी कसरत करावी लागली. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कोल्हापुरात येतील. मोठ्या मोठ्या गप्पा मारून निवडणूक जिंकता येत नाहीत. निधी आणण्यासाठी सरकार असावे लागते. आज विरोधक यांच्याकडे काही नाही मग निधी आणणार कुठून. या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवू असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

FAQs :

Q1. कोल्हापूर महापालिकेत महायुती कोणकोणत्या पक्षांची आहे?
👉 भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आहेत.

Q2. भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार आहे?
👉 भाजप 36 जागांवर उमेदवार देणार आहे.

Q3. शिवसेना आणि राष्ट्रवादी किती जागांवर लढणार?
👉 शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर निवडणूक लढवणार.

Q4. महायुतीच्या जागावाटपाची घोषणा कोणी केली?
👉 राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी घोषणा केली.

Q5. महायुतीचा निर्णय इच्छुक उमेदवारांसाठी कसा ठरला?
👉 जागावाटप स्पष्ट झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT