Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पहिल्याच परीक्षेत पडळकर नापास! खानापूर नगरपंचायतीत भाजपला भोपळा

खानापूर नगरपंचायतीची निवडणूक (Nagar panchayat Election) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिष्ठेची केली होती.

सरकारनामा ब्युरो

खानापूर : खानापूर नगरपंचायतीची निवडणूक (Nagar panchayat Election) भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी शिवसेना (Shivsena) - काँग्रेसच्या (Congress) पॅनेलने बाजी मारली. सत्ताधारी शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या असून, त्यांचा एक समर्थक अपक्ष निवडून आला. भाजपाने या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही.

खानापूर (Khanapur) ग्रामपंचायतीची नगरपालिका झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-शिवसेना महाआघाडी, विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांची जनता आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत झाली. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार अनिल बाबर, सुहास शिंदे, पांडुरंग डोंगरे यांनी केले. त्यांनी 17 पैकी 9 जागा जिंकून काठावरील बहुमत मिळावले आहे.

या निवडणुकीत भाजपनेही जोर लावला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ताकद लावली होती. पडळकर यांनी खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यातील स्थानिक पातळीवर राजकीय प्रवेशाचा प्रयत्न केला होता. मात्र, भाजपला भोपळाही फोडता आली नाही. खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकालाचा परिणाम जुन्या खानापूर जिल्हा परिषद गटावर होणार आहे. आगामी काळात गावोगावच्या सोसायट्यांच्या निवडणुका आहेत. शिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढील वर्षात होणार आहेत. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

निवडणुकीत सत्ताधारी आमदार अनिल बाबर व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना शिंदे यांच्या कॉंग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीने सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले. या आघाडीच्या राजेंद्र माने, सचिन शिंदे, राजाभाऊ शिंदे यांच्या गटाने सत्ता परिवर्तनासाठी ताकद लावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT