बार्शीच्या विशाल फटे प्रकरणात आता आंधळकरांची उडी

बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेला विशाल फटे (Vishal Phate) आता पोलीस कोठडीची हवा खात आहे.
Vishal Phate News
Vishal Phate NewsSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : कोट्यवधींचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) हा सध्या पोलीस (Police) कोठडीची हवा खात आहे. बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या फटेमागे कुणाचा वरदहस्त आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना (Shivsena) नेते व माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांनी या प्रकरणात बॉम्ब टाकला आहे.

आंधळकर यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यामागील पुढारी कोण? असा थेट सवालही त्यांनी केला आहे. विशाल फटे याला ऑफिसला जागा कुणी दिली आणि ती कुणाच्या मालकीची होती? त्याला भगवंत सहकारी मधून वेळोवेळी कर्ज कुणी दिले? पतसंस्थेने यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज कोणाला दिले का? असे प्रश्न आंधळकरांनी उपस्थित केले आहेत. यामुळे या प्रकरणातील खरा सूत्रधार कोण, याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. (Vishal Phate Latest News)

मागील काही दिवसांपासून फरार विशाल फटे हा 17 जानेवारीला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला होता. त्याने पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे जाहीर केले होते. फटे हा कर्नाटकात पळून गेला होता. तेथून तो एसटी बसने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो 17 जानेवारीला रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला. तेथील पोलिसांनी त्याला ओळखले नाही. यावर त्यानेच विशाल फटे अशी ओळख सांगितली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. त्याला बार्शी येथील न्यायालयात 18 जानेवारीला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Vishal Phate News
बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटेला व्हायचं होतं पाब्लो एस्कोबार!

विशाल फटे याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. अजूनही फटेविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून येत असल्यामुळे हा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Vishal Phate News
मोठी बातमी : करोडोंचा चुना लावणाऱ्या विशाल फटेला न्यायालयाचा दणका

या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो कर्नाटकात वास्तव्यास होता. आता तो पोलीस कोठडीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com