Kirit Somaiya criticise Uddhav Thackeray, Kirit Somaiya News, Political News Marathi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी आपले इमान विकलं!

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र मधील जनता माफ करणार नाही.

सरकारनामा ब्युरो

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टीका केली. सोमय्या हे आटपाटी (सांगली) येथे एका कार्यक्रमात बोलत होते. (Kirit Somaiya News)

"पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नावावर ज्यांनी मते घेतली त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आपले इमान विकलं, महाराष्ट्राची बेइमानी करण्याचं काम 'माफिया सेने'च्या नेत्यांनी केलं," असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya news update)

भाजपचे (bjp) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते.

सोमय्या म्हणाले, "भगवा झेंडा हातात घेऊन शिवसेनेनं श्री रामाच्या नावानं मतं मागितली, आता आदाब करायला लागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र मधील जनता माफ करणार नाही. या वसुली आणि माफिया सरकारपासून महाराष्ट्रला मुक्त करण्याचा आम्ही विडा उचलला आहे. आणि तो करूनच दाखवणार," असा विश्वास सोमय्यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार यांची नुकतीच ब्राह्मण समाजाने भेट घेतली, यावरुन पवारांवर खोत यांनी टीका केली. सदाभाऊ खोत म्हणाले, "नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही,"

'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,' असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT