Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : इशारा सभेत चंद्रकांत पाटलांचा रूद्रावतार : जयंत पाटलांच्या निकटवर्तींयांचे 5 कथित घोटाळे रडारवर

Chandrakant Patil Strong attack on Jayant Patil : आगामी स्थानिकच्या आधी सांगलीचे राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे. येथे भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यात जोरदार राजकीय युद्ध सुरू असतानाच यात भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची एन्ट्री झाली आहे.

Aslam Shanedivan

  1. भाजपच्या इशारा सभेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर जोरदार निशाणा साधला.

  2. पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित 5 प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला.

  3. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

Sangli News : सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील विरुद्ध भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाद चांगलाच गाजत आहे. गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, त्याला राष्ट्रवादीने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चामधून उत्तर दिले. यावर भाजपने इशारा आणि उत्तर सभा घेऊन पुन्हा जयंत पाटील यांना डिवचले. या सभेमुळे पडळकर विरुद्ध पाटील वादात भाजपच्या सर्वच आमदारांनी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे.

भाजपच्या इशारा सभेत आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, महिला नेत्या नीता केळकर, प्रदेश सरचिटणीस स्वाती शिंदे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भारती दिगडे, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेस 40 हजारांपेक्षा जास्त कार्यकर्तेही ऑनलाईन सहभागी होते.

याच सभेत चंद्रकांत पाटील यांनी आपला रूद्रावतार दाखवत जयंत पाटील यांना घेरण्यासाठी जाळ टाकलं आहे. चंद्रकांतदादा यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संबंधित 5 प्रकरणांची चौकशी आपण करू असा इशाराच दिला. ज्यात जिल्हा बँक घोटाळा, ऑनलाईन लॉटरी घोटाळा, सर्वोदय कारखाना, ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या, वाशी बाजार समितीतील घोटाळ्याची चौकशी लावू असाही इशारा दिला आहे. हा दावा करताना चंद्रकांतदादा यांनी या प्रकरणाची चौकशी लावल्यास राष्ट्रावादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावं लागेल, असेही म्हटलं आहे.

यावेळी या घोटाळ्यांची जबाबदारी 5 नेत्यांवर देत असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. जिल्हा बँकेच्या घोटाळ्याच्या पाठपुराव्याची जबाबदारी सदाभाऊ खोत, सर्वोदय कारखाना परत मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याच्या चौकशीची जबाबदारी आमदार सत्यजित देशमुख यांच्यावर दिली आहे. तर वाशी बाजार समितीत घोटाळ्याच्या चौकशी केली जाईल असा इशारा दिला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, ठाण्यातील बिल्डरच्या आत्महत्या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून दोषीला जेल टाकण्याची जबाबदारी आपण स्वत: घेतल्याचे सांगितले आहे. एका अर्थाने चंद्रकांत पाटील यांनी विविध प्रकरणांची चौकशी लावू असे संकेत देत राष्ट्रवादीसह नेत्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणांची चौकशी होणार का? या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे समोर येणार का? यासह चंद्रकांत पाटील यांनी ज्या शिलेदारांवर ही जबाबदारी सोपवली आहे ती ते पार पाडणार का? हे पाहावं लागणार आहे.

FAQs :

प्र.१: चंद्रकांत पाटील यांनी कोणावर इशारा दिला?
उ: जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर.

प्र.२: कोणत्या सभेत हा इशारा देण्यात आला?
उ: भाजपच्या इशारा सभेत.

प्र.३: किती प्रकरणांची चौकशी करण्याचा इशारा दिला?
उ: पाच प्रकरणांची चौकशी करण्याचा.

प्र.४: या इशाऱ्याचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उ: भाजप-राष्ट्रवादीमध्ये तणाव अधिक वाढू शकतो.

प्र.५: चंद्रकांत पाटील यांनी कोणता पवित्रा घेतला?
उ: रूद्रावतार दाखवत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT