
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर पक्षांनी निषेध मोर्चा काढल्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिउत्तर दिले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत १ ऑक्टोबरला मोठी सभा घेऊन “प्रचंड मोठा रावण दहन” करण्याची घोषणा करत जयंत पाटील यांच्या भ्रष्टाचार चौकशीची मागणी केली.
त्यांनी गोपीचंद पडळकर यांना राजारामबापू पाटील यांच्यावर बोलू नका असा सल्ला दिला, पण जयंत पाटील यांच्यावर कठोर आरोप कायम ठेवले.
Sangli, 25 September : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर सर्वपक्षीयांचा निषेध मोर्चा निघाला. पडळकर यांच्या विरोधात हा मोर्चा असताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्याला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
इशारा सभेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काढलेल्या मोर्चाला उत्तर देणार असून लवकरच रावण जाळणार आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे. एक ऑक्टोबरला सांगलीत भाजपची या संदर्भात सभा होणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या सांगलीतील एका कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी आमदार गोपीचंद पडळकरही (Gopichand Padalkar) उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांचे कान टोचत, राजारामबापू पाटील यांच्यावर बोलण्याची गरज नाही. त्यांच्याच पुतळ्याला नमस्कार करून मुलगा जयंत पाटील यांचा भ्रष्टाचार बाहेर काढा, असा थेट सल्ला दिला.
दरम्यान, सांगली जिल्हा बँकेतील घोटाळ्याची आणि ऑनलाईन लॉटरीची पुन्हा चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी करत नोकरभरती चौकशी झालीच पाहिजे. सर्वोदय कारखाना कुणी लाटला? आता जयंत पाटलांना सोडणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. एक ऑक्टोंबरला होणाऱ्या सांगलीतील सभेत आम्ही प्रचंड मोठा रावण दहन करणार आहोत, असेही पाटील म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आम्ही त्यांना चांगलीच समज देऊ. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवरीस यांनी तुमचं काय घोडं मारलं होतं? मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या भाषेत टीका केली गेली. पडळकर यांना तुम्ही सर्वजण घाबरता म्हणून एकत्र येऊन टीका करता. जर कोणी अंगावर येत असेल तर शिंगावर घ्या, असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना द्यायलाही चंद्रकांत पाटील विसरले नाहीत.
प्र: निषेध मोर्चा का निघाला होता?
उ: आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे.
प्र: चंद्रकांत पाटील यांनी कोणत्या तारखेला सभा जाहीर केली?
उ: १ ऑक्टोबरला सांगलीत मोठी सभा.
प्र: त्या सभेत काय विशेष करण्यात येणार आहे?
उ: “प्रचंड मोठा रावण दहन” करण्याची घोषणा.
प्र: चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर कोणते आरोप केले?
उ: सांगली जिल्हा बँक घोटाळा, ऑनलाईन लॉटरी व नोकरभरती चौकशीसंबंधी भ्रष्टाचाराचे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.