Chandrakant Patil Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : 'सत्तेचा गैरफायदा घेतला, पण आता आमची सत्ता, न्याय...'; ‘सर्वोदय’वरून दादांनी जयंत पाटलांवर तोफ डागली

Chandrakant Patil On Jayant Patil over Sarvodaya Sugar Factory : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भाजपच्या आणखी एका जेष्ठ नेत्याने जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : सांगलीतील सर्वोदय सहकारी साखर कारखान्यावरून सध्या भाजपचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कारभाराचे वाभाडे काढले काढताना दिसत आहेत. मध्यंतरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच जयंत पाटील यांनी बँकेच्या माध्यमातून जतमधील सहकारी साखर कारखाना, सर्वोदय कारखाना यांनी कसा विकत घेतला. यावरून आरोप केले होते. यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील यावरून जयंत पाटलांवर जोरदार टीका करताना त्यांना, सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी किती पैसे पाहिजेत? अशी विचारणाच केली आहे. यामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना परत करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील याचा आकडा सांगावा. ते मी द्यायला तयार आहे असे म्हणत आव्हान दिले. ते भाजपच्या 11 वर्षांच्या सत्ताकाळातील विविध विकास कामांच्या फलकांचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन देखील केले.

यावेळी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर ‘सर्वोदय’प्रकरणी तोफ डागली. ते म्हणाले, हा खूप जुना विषय असून याचा तिढाही तितकाच जुना आहे. जो भाजपच्या सत्ताकाळात 2014 ते 2019 दरम्यान कायदेशीर मार्गाने सोडवत आणला होता. त्यावेळी हा कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता. त्यावर्षी गाळप परवानाही देण्यात येणार होता. मात्र तोवर महापूर आला. पुढे काही काळात सत्ता बदलली.

जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रांत फेरबदल केले. त्यानंतर कोरोना आला. आता आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय होईल. जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, त्यांनी सांगावे, किती पैसे द्यायचे, असे आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांना ‘आता कार्यालयाचं रुपडं बदला,’ अशी गंमतीशीर सूचना केली. ‘आप्पा याच ठिकाणी बसून चारवेळा आमदार झाले. इथं आलं की काम होतं, हे लोकांना माहिती होतं. आम्ही विद्यार्थीदशेत असताना आप्पा व रामचंद्र देशपांडे यांची भेट घेऊनच जायचो,’ अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.

‘देर है, अंधेर नहीं’

‘पृथ्वीराज पवार यांच्या पाठीवर हात ठेवा, त्यांना बळ द्या,’ असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल, माहिती नसतं. त्यातच मजा असते. पृथ्वीराजच्या बाबत देर है, लेकिन अंधेर नहीं, मी त्याच्यासोबत आहे, असेही आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांच्याबाबत दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT