Operation Sindoor, Rahul Gandhi, Sanjay Raut And Chandrakant Patil
Operation Sindoor, Rahul Gandhi, Sanjay Raut And Chandrakant Patilsarkarnama

Chandrakant Patil : ऑपरेशन सिंदूरवरून टीका करणाऱ्या राहुल गांधी, संजय राऊतांना भाजप नेत्याने झाप झापलं; म्हणाले, 'काही जणांना...'

Rahul Gandhi and Sanjay Raut : नुकताच ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची बाजू मांडण्यासाठी जगभर गेलेल्या खासदारांच्या वेगवेगळ्या टीम परतल्या. यादरम्यान काँग्रेससह उद्धव ठाकरें यांच्या पक्षाकडून सतत टीका होत होती.
Published on

Sangli News : 'ऑपरेशन सिंदूर'बाबत परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे सात शिष्टमंडळ परदेशात पाठली होती. ज्यात काँग्रेसच्या चार आणि उद्धव ठाकरे गटाच्या एका खासदाराचा समावेश होता. पण याच शिष्टमंडळ आणि भाजपवर काँग्रेसकडून आणि शिवसेनेकडून अनेकदा टीका करण्यात आली होती. याच टीकेचा आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार समाचार घेतला असून त्यांनी, काही जणांना फक्त प्रश्न उपस्थित करणे एवढंच माहिती असतं असा टोला लगावला आहे. त्यांनी ही टीका काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

'ऑपरेशन सिंदूर'बाबत परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आली होती. ज्यात काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारासह 51 नेते आणि 8 राजदूतांचा समावेश होता. पण यावरून काँग्रेसने अनेकदा टीका केली होती. तसेच संजय राऊत यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

चंद्रकांत पाटील यांनी, 'काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे, एवढंच माहिती आहे. 'ऑपरेशन सिंदूर'बाबत देशाची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्या स्वपक्षाच्या खासदारांना देखील यांनी विरोध केला. तर सध्या काही जणांचा असा एक गट झाला आहे. जे सगळे एकमेकांचे शिष्य, भक्त आणि गुरु झाले आहेत, असाही टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

Operation Sindoor, Rahul Gandhi, Sanjay Raut And Chandrakant Patil
Chandrakant Patil : अखेर सदस्य निवडीला मुहूर्त लागलाच! दादांनी केली सदस्यांची नावे निश्चित; भाजपसह मित्र पक्षांची धाकधूक वाढली

सातत्याने वेगवेगळ्या घटनांवर उलट सुलट प्रतिक्रिया देणाऱ्या संजय राऊत यांना बहुतेक कावीळ झाली असावी असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला आहे. राऊत यांना सर्वच घटना एकसारख्याच पिवळ्या दिसतात. यामुळे आता राऊत यांना झालेल्या काविळीचे औषध तयार केले असून ते योग्य वेळी त्यांना मिळेल, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com