Aaditya Thackeray, Praveen Darekar News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praveen Darekar News : ''शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते''

Aaditya Thackeray News : भाजपा नेते प्रवीण दरेकरांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

सरकारनामा ब्यूरो

Satara News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची लाज शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी काढली. त्यांचा जीव केवढा त्याचे वय काय? खरेतर शेंबड्या पोराने मुख्यमंत्र्यांची लायकी काढणे महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते, अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

प्रवीण दरेकर हे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांच्या नातवाने शेण खाल्ले अशी टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. मात्र, आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा नातू देखील शेण खातोय, असा टोला त्यांनी लगावला.

राऊतांच्या वक्तव्याला आम्ही विशेष महत्त्व देत नाही. बेतावल वक्तव्य करून प्रसिद्धीत राहायचे हे त्यांचे काम आहे, असेही दरेकर म्हणाले. सरकार अपात्र ठरेल याबाबत राऊत यांनी आतापर्यंत 7 तारखा दिल्या. त्यांनी फक्त वाटच बघावी आम्ही ही कारकीर्द पूर्ण करणार आणि पुढील पाच वर्षे देखील फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार येईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की कुणाचा बाप आला तरी आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार नाही. भावनिक वातावरण करून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे करतात. यांना बेताल वक्तव्य करायची टोमणे मारायचे याच्या पलीकडे यांची औकात नाही, असेही दरेकर म्हणाले.

हा प्रग्लब विचारांचा महाराष्ट्र आहे. असे किती येतात अन् किती जातात. या मातीत अनेक पक्षांनी पाय रोवण्याचा प्रयत्न केला. आप (AAP) देखील महाराष्ट्रात धडपड करत आहे. कोणीही येऊ अगदी बीआरएस (BRS) आले तरी काही फरक पडणार नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT