Ajit Pawar on Chhagan Bhujbal: भुजबळांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा केल्यानंतर अजितदादा म्हणाले...

Baramati News: छगन भुजबळांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा दुसऱ्या समाजाला देण्याची आग्रह केला आहे.
Ajit Pawar, Chhagan Bhujbal
Ajit Pawar, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar on State President: मुंबईत बुधवारी (ता. २१) राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा झाला. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मला विरोधी पक्षनेते पद नको होते. आता पक्षात कुठलेही पद द्या, त्याला न्याय मिळवून देईन' अशी स्पष्ट मागणीच केली. त्यांच्या या मागणीनंतर माजी मंत्री छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद ओबीसी किंवा दुसऱ्या समाजाला देण्याची आग्रह केला आहे.

त्यानंतर आज (26जून) अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भूजबळ यांनीही प्रदेशाध्यक्ष पद दुसऱ्या समाजाला देण्याची मागणी केली आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मी व्यासपीठावर, जिथे सगळे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी होते, त्या सगळ्यांसमोर माझी मागणी मांडली आहे. आता निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.

Ajit Pawar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar on Eknath Shinde : "कुठं गटार तुंबलं.." शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा

भूजबळ साहेबांनी का बोलू नये, तो त्यांचा अधिकार आहे. जर सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जायचं असेल तर वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधीत्व का मिळू नये, त्यामुळे त्यांचं बरोबरच आहे. मी पक्षाकडे माझी मागणी केली आहे. त्याबद्दल आम्ही बसून पुढचा निर्णय घेऊ. पक्षात आपली मते मांडण्याचा अधिकार लोकशाहीत असला पाहिजे. शेवटी पक्ष जे ठरवेल ते अंतिम असेल. पण पक्षापुढे आपली मागणी करायचीच नाही, असं कसं चालेल, असा सवालही अजित पवारांनी केला. (NCP Politics)

Ajit Pawar, Chhagan Bhujbal
Sharad Pawar on Eknath Shinde : "कुठं गटार तुंबलं.." शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा

विरोधी पक्षनेतेपदही तितकचं ताकदीचं आहे, पण तरीही तुम्हाला ते का नकोय."गेले ३२ वर्षे मी राज्यमंत्री, आमदारकी, खासदारकी, कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्ष नेतेपद, उपमुख्यमंत्री पद, एवढी पदे भूषवल्यानंतर संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय हरकत आहे. काम करायचं म्हटलं तर कसही करता येतं, संघटनेत काम करायचं असेल तर, आतापर्यंत भूजबळ साहेब, बबनराव पाचपुते, मधूकरराव पिचड, सुनील तटकरे, दिवंगत आर.आर, पाटील, अरुणभाई गुजराती, जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले. संघटनेत त्यांनी वेगवेगळी पदे भूषवली. मी तर म्हटलंय ना जे पद योग्य वाटतयं ते पद मला द्या," अस उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com