Shrikant Deshmukh Latest News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध देऊन..! श्रीकांत देशमुखांचा धक्कादायक खुलासा

श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूरचे (Solapur) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्याचा पदाचा राजीनामा दिला. या राजीनामा पत्रामध्ये त्यांनी आपबीती सांगत आरोप फेटाळून लावले आहेत. (Shrikant Deshmukh News)

काही दिवसांपूर्वी श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला हॅनीट्रॅपमध्ये अडकविल्याची तक्रार मुंबईच्या ओशिवारा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर मंगळवारी देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूमधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांकडून तातडीने देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा देताना देशमुख यांनी आपल्याला राजकीय विरोधकांकडून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.

देशमुख यांनी काय म्हटलं आहे?

महिलेने आपल्याला ग्रीन टीमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर माझ्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून चारित्र्यहननाचा प्रयत्न केला. यामध्ये राजकीय विरोधकांच्या सहभागाची दाट शक्यता आहे. या महिलविरोधात आधीच मी ओशिवारा पोलीस ठाण्यात हनीट्रॅप आणि खंडणीचा गुन्हा दाखल केल्याचं देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

देशमुख यांचा एका महिलेसोबत बेडरूममधील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत संबंधित महिला आणि देशमुख दिसत आहे. देशमुख हे अंतर्वस्त्रावर बेडवर बसलेले आहेत. संबंधित महिला मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन देशमुखांचे नाव घेत त्याने आपल्याला फसविल्याचे सांगत असल्याचे दिसत आहे. हे वाक्य ऐकताच देशमुख हे बेडवरून उठले आणि त्यांनी मोबाईलचे चित्रीकरण बंद केल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT