Gopichand Padalkar-Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Bank: भाजप आमदार पडळकरांना दुष्काळाचा विसर.., मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच धुडकावलं? आलिशान गाड्यांचा ताफा, फटाके फोडले अन्...

Sangli Dcc Bank Election 2026: सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे.जत ,कवठेमहांकाळ, आटपाडी , मिरज तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर देखील केले आहे. याचदरम्यान,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत तालुक्यात तर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.

Deepak Kulkarni

Sangli News: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे..मात्र अर्ज भरताना गोपीचंद पडळकरांनी केलेला जल्लोष,फटाक्यांची आतिषबाजी आणि काढलेली रॅली यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. दुष्काळी आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अर्ज भरण्याच्या निमित्ताने केलेल्या,डामडौलामुळे आमदार पडळकर आता विरोधकांच्या टीकेचे धनी बनले आहेत.

सांगली जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. जत ,कवठेमहांकाळ, आटपाडी , मिरज तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर देखील केले आहे. याचदरम्यान,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जत तालुक्यात तर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.

अशा परिस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज करताना केलेला डामडौल आता चर्चेचा आणि टीकेचा विषय बनला आहे.. आलिशान गाड्यांचा ताफा,फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि शक्तिप्रदर्शनावरून टीकेची झोड उठली आहे.

जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी टीका करताना ही महाराष्ट्रची संस्कृती नाही,तुम्ही जत मधील आमदार आहात,जत तालुक्यात दुष्काळ आहे.त्यामुळे आलिशान गाड्यांचा ताफा आणि फटाक्यांची आतिषबाजी करणे न पटणारे,असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकरांना दुष्काळाचं गांभीर्य नसल्याचा जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलिशान गाड्यांचा ताफा आणि फटाक्यांची आताषबाजी,घोषणाबाजी याला बालिशपणा म्हणावा लागेल,अशी खोचक टीकाही आमदार इद्रिस नायकवडी यांनी केली आहे.

दरम्यान,सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना भाजप आमदार गोपीचंद पळकरांचा तामझाम पाहायला मिळाला.या सर्व प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांनी स्पष्टीकरण देताना आपल्याकडे फटाके उडवण्यात इतके पैसे असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे.

सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्य दुष्काळाच्या भीषण सावटाखाली होरपळत आहे.या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी 'मोठे कार्यक्रम करू नका,उधळपट्टी टाळा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करा, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

मात्र, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि दुष्काळी आमदार म्हणून भाजपच्या गोपीचंद पडळकरांची ओळख आहे. मात्र,आता त्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवत,दुष्काळग्रस्तांची चेष्टा केल्याची चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT