Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून वाल्मीक कराडचा फोन', खासदार बजरंग सोनवणेंचा दावा!

Beed Vilas Ghule Murder Case : बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
Beed Vilas Ghule Murder Case; walmik karadm, NCP SP MP Bajrang Sonawane And Son Saurabh Sonawane
Beed Vilas Ghule Murder Case; walmik karadm, NCP SP MP Bajrang Sonawane And Son Saurabh SonawaneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Vilas Ghule Case News : विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्यासाठी वाल्मीक कराड याने कारागृहातून बाहेर फोन केले होते, असा खळबळजनक दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. या दरम्यानचे फोन कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सोनवणे यांनी माध्यमांना दिला.

या कथित फोनमधील संभाषणामध्ये एक व्यक्ती पोलीसाला उद्देशून कोणत्याही परिस्थिती त्याच्यावर गुन्हा दाखल कर, तुला हात जोडून विनंती करतो. यावर संबंधित व्यक्ती हा जी अण्णा, जी अण्णा म्हणत करून घेतो, असे म्हणत आहे. बजरंग सोनवणे यांच्या या दाव्याने बीड जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

२१ जून २०२६ रोजी केज तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल चालक विलास घुले यांच्यावर दोन गटांमध्ये सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेले असताना धारदार शस्त्राने हल्ला झाला होता. यात विलास यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण तापले होते. या प्रकरणात सुरुवातीला नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

Beed Vilas Ghule Murder Case; walmik karadm, NCP SP MP Bajrang Sonawane And Son Saurabh Sonawane
Bajrang Sonawane : विलास घुले हत्याप्रकरणात मुलाचा पाय खोलात, पोलिसांकडून पहिली कारवाई होताच बजरंग सोनवणे आक्रमक; “मी बीडचा वाघ...”

या प्रकरणात घुले कुटुंबियांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचा सहभाग आणि आरोपींना पळून जाण्यासाठी गाडी पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. रास्तारोको आणि विलास घुलेचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर आणल्यानंतर पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव नोंदवण्यात आले होते.

यावर बजरंग सोनवणे यांनी हे आपल्या व मुलाच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत वेळ आल्यावर सगळे पुरावे समोर आणेल, असा इशारा दिला होता. माझा मुलगा दोषी असेल तर खुशाल चौकशी करा, कारवाई करा, अशी भूमिका सोनवणे यांनी घेतली होती. तीन महिन्यानंतर आता या प्रकरणात बजरंग सोनवणे यांनी आपल्या मुलाला अडकवण्यासाठी बीडच्या कारागृहातून थेट सुत्रे हलली, असा दावा केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड यानेच आपल्या मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन केले होते, असा आरोप सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. पुरावा म्हणून फोन कॉल रेकॉर्डिंगची एक ऑडिओ देखील सोनवणे यांनी माध्यमांना दिली आहे.

'त्या' गाबड्याला अडकवा..

या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमधील संवादानूसार खासदार बजरंग सोनवणेच्या पोराला विलास घुले खून प्रकरणात अडकवा, त्याच्यावर गुन्हा दाखल कर. मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवा, टाकीवर चढा तुला भगवान बाबाची शपथ, पण त्या गाबड्याला अडकवा असं वाल्मीक कराड बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर प्रतिसाद देताना समोरची व्यक्ती 'जी आण्णा जी आण्णा' असं म्हणत आहे. यावरून हा फोन बीड कारागृहातून वाल्मीक कराड यानेच केला होता, असा दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण? बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर घुले कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले होते.

नेमके आरोप काय?

२१ जून २०२६ रोजी विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सुरुवातीला नऊ आरोपींना अटक करण्यात आली. परंतु घुले कुटुंबीय खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेच्या मागणीसाठी आग्रही होते. त्यांचा आरोप असा होता की, सौरभ सोनवणे यांनीच विलास घुले यांना मारण्यास आरोपींना सांगितले. आरोपींना पळून जाण्यास मदत केली.

विलास घुले जखमी अवस्थेत असताना त्यांनी सौरभ सोनवणे यांचे नाव घेतले होते, असा दावाही विलास यांचे बंधु रमेश घुले यांनी केला होता. आरोपींकडून सौरभ सोनवणे यांना ५७ फोन कॉल झाल्याचा दावा केला आणि त्या कॉल रेकॉर्डचा सखोल तपास करण्याची मागणी घुले कुटुंबियांकडून करण्यात आली. या प्रकरणाचा तपास आधी एसआयटी आणि आता सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

Beed Vilas Ghule Murder Case; walmik karadm, NCP SP MP Bajrang Sonawane And Son Saurabh Sonawane
Bajrang Sonawane News : खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारला दुचाकी धडकली; तरूण जखमी, तर गाडीचे किरकोळ नुकसान!

दरम्यान, या प्रकरणात सीआयडीने १५ सप्टेंबर २०२६ रोजी केज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून त्यात १० आरोपींची नावे आहेत. सौरभ सोनवणे यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट नसल्याचे समजते. तपासात सौरभ यांचा हत्येत सहभाग किंवा आरोपींना मदत केल्याचा पुरावा आढळला नसल्याने दोषारोपपत्रात त्यांचे नाव नसल्याचे सांगीतले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com