Sadabhau Khot in goa election campaign  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजकारण तापलं! सदाभाऊ खोत थेट उतरले गोव्याच्या मैदानात

गोवा विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू असून, राजकारण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील मतदान आता आठवड्यावर आले असून, प्रचाराला जोर चढला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गोव्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. आता प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, भाजपने (BJP) आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना मैदानात उतरवले आहे.

सदाभाऊ खोत यांच्यासोबत भोसरीचे आमदार महेश लांडगेही गोव्यात आहेत. खोत यांनी आज म्हापसा विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. भाजपचे उमेदवार जोशुआ पीटर डिसोझा यांच्या प्रचारासाठी त्यांनी म्हापसातील डांगी कॉलनी, वॉर्ड नं. ५ येथे घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. या वेळी बोलताना खोत म्हणाले की, गोव्यातील इतर मतदारसंघांप्रमाणे विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी म्हापसावासियांनी या वेळी परिवर्तन घडवावे. गोव्याला भाजपचे स्थिर सरकार देण्यासाठी योगदान द्यावे.

गोव्यातील निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. सत्ताधारी भाजपने पुन्हा सत्तेची दोरी आपल्याच राहावी, यासाठी चंग बांधला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. फडणवीस यांच्या दिमतीला महाराष्ट्रातून मोठी कुमक पुरवली जात आहे. आता आमदार सदाभाऊ खोत हे गोव्यातील मैदानात उतरले आहेत. याआधी माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे आणि पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे प्रचाराच्या आखाड्यात उतरले होते.

देशात यावर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परंतु, आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे ठरवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT