दत्तात्रय पाटील
Jaysinghpur News: जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये आमदार राजेंद्र पाटील यांच्या राजश्री शाहू आघाडीसोबत भाजपच्या ताराराणी आघाडीची चर्चा फिस्कटल्यानंतर महाडिक गटाने थेट काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिरोळ नगरपालिकेमध्ये आमदार अशोकराव माने यांच्या सुनेच्या प्रचाराला गेलेल्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी मोठी घोषणा केली आहे.
शिरोळ नगरपालिकेमध्ये ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजप स्वतंत्र रिंगणात असणार आहे अशी घोषणा महाडिक यांनी केली. शिरोळ शहराचा गेल्या सात आठ वर्षांमध्ये म्हणावा तसा विकास झालेला नाही. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यामध्ये संबंधितांना अपयश आले आहे. त्यामुळे शिरोळच्या जनतेने सर्वांगीण विकासाकरिता ,ताराराणी आघाडी पक्ष च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सारिका अरविंद माने यांच्यासह वीस नगरसेवकांना, मताच्या रूपाने पाठबळ देतील ,अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारपरिषद मध्ये दिली.
खासदार धनंजय महाडिक यांनी ताराराणी विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सारिका अरविंद माने यांच्या प्रचारार्थ प्रभाग चार मध्ये प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाडिक म्हणाले, शिरोळ तालुका हा आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेला तालुका आहे. तथापि अनेक ठिकाणी नागरी सुविधा अद्यापही पोहोचलेल्या नाहीत. शिरोळ शहराचा विचार करायचा झाल्यास, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, उपनगरातील रस्ते, गटारी, क्रीडांगण, बागबगीचा , नगरपरिषदे करता सुसज्ज इमारत, यासारखे विविध प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत.
राज्यात महायुतीची सत्ता असताना असतानाही, येथील नेते मंडळींनी म्हणावा तसा विकास केलेला नाही. केंद्रात व राज्यात भाजप (BJP) युतीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून निधी आणणारे, सक्षम नेतृत्व आमदार अशोकराव माने यांच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध झाले आहे. त्यांच्या सुनबाई सारिका माने व अरविंद माने हे देखील शहराच्या विकासाकरीता पाठपुरावा करण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांना, जनतेने सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही यावेळी केले.
यावेळी तालुक्याचे भाजपचे नेते व गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाडगे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, माजी नगरसेवक अरविंद माने, श्रीवर्धन माने देशमुख, माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख ,दादासाहेब कोळी ,प्रमोद लडगे आप्पासाहेब गावडे यांच्यासह सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भाजपचे उमेदवार, ताराराणी आघाडीच्या वतीने व यड्रावकर यांचे उमेदवार राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवण्याबाबत एकमत झाले होते. तथापि काही दिवसांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी, अशी भूमिका आमदार यड्रावकर यांनी घेतल्यामुळे तालुक्यामध्ये भाजपने काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावरती व काही ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून ताराराणी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत असा खुलासा, आमदार माने यांनी पत्रकांच्या प्रश्नाला उत्तर देताना केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.