

1️⃣ अकलूज नगरपरिषद निवडणुकीत भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल उतरवले असून, रणजितसिंह मोहिते-पाटील यांना पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले आहे.
2️⃣ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अकलूजमधील “दहशत, खंडणी आणि भययुक्त वातावरणापासून मुक्ती” मिळवण्याचे कारण देत हा निर्णय योग्य असल्याचा दावा केला.
3️⃣ या निर्णयामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सलग तिसऱ्यांदा कोंडी झाल्याचे मानले जात आहे.
Solapur, 20 November : अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरविला आहे. भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना बाजूला ठेवून पक्षाने हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मोहिते पाटलांना वगळून भाजपने अकलूजमध्ये स्वतंत्र पॅनेल का उभा केले, याचे उत्तर खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore)म्हणाले, अकलूज शहराचं वातावरण काय आहे, हे पाहिले पाहिजे. अकलूजमधील व्यापारी, डॉक्टर आणि सामान्य जनता काय म्हणतेय. या सगळ्यांना दहशतवाद्यातून मुक्ती पाहिजे. जे भययुक्त वातावरण, खंडणीखोरांनी अख्खा पेठेला व्यथित केलेले आहे. या सर्वांपासून अकलूज शहराला मुक्ती पाहिजे. या घटकाला आणि जनतेला जे अपेक्षित आहे, त्या गोष्टी करणं, हे आमच्या दृष्टीने योग्य आणि महत्वाचं होतं.
या सर्व प्रवृत्ती जनतेला नको आहेत, अशा प्रवृत्तींना बाजूला ठेवून आम्ही सामान्य माणसांचं, सामान्य कार्यकर्त्याचं, निष्कलंक, भयमुक्त आणि खंडणीमुक्त अकलूज (Akluj) करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पॅनेल उभं केलं आहे. अकलूजची जनता आमच्यासोबत राहील. व्यापारी बांधव, डॉक्टरपासून समाजातील सर्व घटक आमच्यासोबत राहतील आणि आमच्या पॅनेलला मदत करतील. त्यामुळे जनतेला जे पाहिजे, ते आम्ही अकलूजमध्ये केले आहे, असा दावा गोरे यांनी केला आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडून भाजपच्या चिन्हावर नगरपालिकेची निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र, भाजपकडून मोहिते पाटील यांच्याऐवजी राम सातपुते यांच्याकडे अकलूज नगरपरिषदेची सूत्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांनी नगरपरिषदेसाठी स्वतंत्र पॅनेल उतरविले आहे.
रणजितसिंहांची कोंडी
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे दूर होते. भाजपचे आमदार असूनही त्यांनी पक्षाच्या प्रचाराच्या व्यासपीठापासून दूर राहावे लागले होते. आताही त्यांची भूमिका भाजपच्या चिन्हावर लढण्याची होती. मात्र, राम सातपुते यांच्या विरोधामुळे तसेच जयकुमार गोरेंच्या भूमिकेमुळे मोहिते पाटील यांना वगळून भाजपने अकलूजमध्ये स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे, त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच रणजितसिंह मोहिते पाटलांची कोंड होण्याची शक्यता आहे.
प्र.1 — भाजपने स्वतःचे पॅनेल का उतरवले?
→ अकलूजमध्ये भयमुक्त व खंडणीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी, असे पालकमंत्र्यांचे मत.
प्र.2 — मोहिते-पाटील नाराज का?
→ त्यांना बाजूला ठेवून नगरपरिषद नेतृत्वात स्थान न दिल्यामुळे.
प्र.3 — रणजितसिंह मोहिते-पाटील कोणता मार्ग अवलंबत आहेत?
→ त्यांनी नगरपरिषदेसाठी स्वतःचे स्वतंत्र पॅनेल उभा केले आहे.
प्र.4 — ही कोंडी नव्याने झाली आहे का?
→ नाही. लोकसभा व विधानसभा प्रचारातूनही त्यांना दूर ठेवण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.