Medha Kulkarni Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune BJP MP : पुण्याच्या खासदाराला केंद्रात महत्त्वाचं पद; राज्यसभेचे कामकाज चालविण्याची मिळणार संधी

Medha Kulkarni Rajya Sabha Deputy Chairman Panel Members List : राज्यसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या उपसभापती पॅनेलच्या यादीत डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सहाव्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्याच्या भाजप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राज्यसभेच्या उपसभापती पॅनेलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सभापतींच्या अनुपस्थितीत राज्यसभेचे कामकाज चालविण्याची संधी आता त्यांना मिळणार आहे. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी ही नियुक्ती केली आहे.

पुण्याच्या खासदाराला केंद्राच्या संसदीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाल्याने भाजपच्या राजकीय वर्तुळात या नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यसभेच्या कामकाजात अध्यक्षीय जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळणे, ही खासदार म्हणून त्यांच्या संसदीय कारकिर्दीतील महत्त्वाची बाब मानली जात आहे.

राज्यसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या उपसभापती पॅनेलच्या यादीत डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सहाव्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे. या पॅनेलमध्ये एस. फांगनॉन कोन्याक, डॉ. एम. थंबीदुराई, डॉ. सस्मित पात्रा, फुलोदेवी नेताम आणि घनश्याम तिवारी यांचाही समावेश आहे.

राज्यसभेचे सभापती अनुपस्थित असताना पॅनेलमधील सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी दिली जाते. सभागृहातील चर्चा नियंत्रित करणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे, कामकाजात शिस्त राखणे आणि संसदीय नियमांनुसार कामकाज पुढे नेणे, अशा महत्त्वाच्या भूमिका या सदस्यांना पार पाडाव्या लागतात.

या नियुक्तीबद्दल डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला असून, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पुण्याच्या प्रतिनिधीला संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज चालविण्याची जबाबदारी मिळाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या कामकाजात आता डॉ. मेधा कुलकर्णी यांना अध्यक्षीय भूमिकेत काम करण्याची संधी मिळणार असून, केंद्रातील संसदीय स्तरावर पुण्याचे प्रतिनिधित्व अधिक ठळक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT