Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपला कधीही गोरगरीब व शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही

सरकारनामा ब्युरो

तळेगाव दिघे ( जि. अहमदनगर ) - संगमनेर तालुक्यातील निमोण येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे जलपूजन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. ( BJP never sympathizes with the poor and farmers )

या जलपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, पंचायत समिती सदस्या मीरा चकोर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बी. आर. चकोर, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, सह्याद्री संस्थेचे संचालक अॅड. ज्ञानेश्वर सांगळे, सुभाष सांगळे, चंद्रकांत घुगे, प्रताप शेळके, बंडू भाबड, अनिल घुगे, दीप्ती सांगळे, दगडू घुगे, साहेबराव मंडलिक, गंगाधर जायभाये आदी उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले, मागील पाच वर्षांत भाजपने शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक दिली. आता या सरकारसाठी ते रोज नवनवीन तारखा देत आहेत. भविष्य सांगत आहेत. भाजपने कायम कूटनीतीचे राजकारण केले. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चिरडणाऱ्या भाजपला कधीही गोरगरीब व शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नाही, अशी टीका थोरात यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, अनेक अडचणीवर मात करून निमोण प्रादेशिक पाणीयोजना पूर्णत्वास आली. या योजनेद्वारे निमोण, पळसखेडे, पिंपळे, सोनेवाडी, कऱ्हे या पाच गावांना शाश्वत पिण्याचे पाणी मिळणार आहे. निमोण परिसरातील गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पंचायत समिती सदस्या मीरा चकोर आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चकोर यांनी योजनेसाठी पाठपुरावा केला. त्यातून ही स्वप्नवत योजना साकार झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. थोरात, चकोर, अॅड. ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घुगे, भाऊसाहेब कुटे यांची भाषणे झाली. मंत्री थोरात यांच्या हस्ते निमोण सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT