kolhapur zp Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur ZP : सांगली, सातारा ZP मध्ये राष्ट्रवादीकडून 'करेक्ट कार्यक्रमाची' तयारी : कोल्हापूरमध्ये शेवटच्या क्षणी सावरला भाजपचा डाव

Detailed analysis of BJP performance in western Maharashtra : सांगली आणि साताऱ्यात अडचणींना सामोरे गेल्यानंतर कोल्हापुरात भाजपने दमदार पुनरागमन केले. जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.

Rahul Gadkar

Kolhapur ZP : महिनाभर लांबलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाची निवड मंगळवारी (17 मार्च) होत आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावर शिक्कामोर्तब झाले. सांगली आणि सातारा जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला वगळून सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले असल्याने कोल्हापूरमध्ये तरी सत्तेत राहता यावे यासाठी भाजपने राष्ट्रवादीचा हट्ट मान्य केल्याची माहिती आहे.

मात्र यानंतरही कोल्हापूरमधील भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोमवारी दिवसभर आणि अगदी आज सकाळी नऊ वाजेपर्यंत व्हेंटिलेटरवर होते. कोल्हापूरमध्येही पडद्यामागे काही वेगळ्या हालचाली सुरु असल्याची चर्चा दबक्या आवाज होती. त्यामुळे भाजपनेही तयारी ठेवली होती. त्यासाठी सुयशा घाटगे यांना कोल्हापूर शहर न सोडण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्याची माहिती समोर आली होती.

त्यातच सर्व सदस्यांना पन्हाळ्या घेऊन जाण्यात आले. अखेर मंत्री चंद्रकांत पाटील आल्यानंतर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष आणि भाजपचा उपाध्यक्ष या सुत्रावर अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीने अध्यक्षपदासाठी शिल्पा खोत यांचे नाव निश्चित केले तर भाजपने उपाध्यक्षपदासाठी गडमुडशिंगीचे सदस्य तानाजी पाटील यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे भाजपने देखील सुटकेचा विश्वास सोडला.

राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा तिढा सकाळी 10 वाजेपर्यंत सुटला नव्हता. यावर सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने योग्य भूमिका घ्यावी, असा फोन भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना सुरू होता, अशी माहिती आहे. त्यामुळे आज नेमके काय होणार, याकडे लक्ष लागले होते.

अशी होणार निवड प्रक्रिया

सकाळी दहा अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर, दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर ३० मार्चला विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड होईल. तसेच १५ एप्रिलला त्या-त्या समित्यांचे सदस्य निवडले जाणार आहेत. अर्ज माघारीची मुदत दोननंतर अध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवातसूचक व अनुमोदक असणारे सदस्य पहिल्यांदा येतील. त्यानंतर पन्हाळ्याहून उर्वरित सर्व सदस्य एका बसमधून दुपारपर्यंत जिल्हा परिषदेत येणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य सकाळी आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा येथील कार्यालयात एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार असेल आणि त्यांच्याकडून उमदेवारी अर्ज दाखल करू नये, अशी विनंती केल्यास अध्यक्ष निवड बिनविरोध होईल. विनंती झाली नाही तर कोणाचा अर्ज दाखल करायचा, हे उद्याच ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT