

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच महायुतीमधील घटक पक्षात सुरू असलेल्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडावा याबाबत निर्णय घेण्यात आला.
अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ जिल्हा बँक बरोबर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद कागललाच नेले. सेनापती कापसे च्या जिल्हा परिषद सदस्य शिल्पा खोत यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाले आहे. आज दुपारी या नावावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या महासभेत शिक्कामोर्तब होणार आहे. तर उपाध्यक्ष म्हणून भाजपचे मुडशिंगी जिल्हा परिषदेचे सदस्य तानाजी पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिल्पा शशिकांत खोत यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाव निश्चित झाल्याची माहिती आज महायुतीच्या सदस्यांसमोर घोषणा करण्यात आली. हा विकास आघाडी कडून देखील अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात येणार असल्याने कोणतीही दगाबाजी होऊ नये यासाठी महायुतीच्या 51 सदस्यांना पन्हाळ्यावर ठेवण्यात आले होते. आज सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोत यांची निवड केली असल्याचे पत्र या बैठकीत दिले.
दरम्यान, काल दिवसभर कोणाचे नाव निश्चित होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लागून राहिले लक्ष लागून राहिले होते. बोरवडे जिल्हा परिषद सदस्य शोभाताई फराकटे, व गिजवणे च्या सदस्य शैलेजा पाटील ही नावे आघाडीवर होती. तसेच दिवसभर या नावांपैकी एक नाव अध्यक्षपदासाठी निश्चित होईल असे असतानाच आज खोत यांचे नाव निश्चित केले. दरम्यान शैलजा पाटील यांचे पती सतीश पाटील हे गोकुळला इच्छुक असल्याने त्यांचे नाव पिछाडीवर पडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान आज बारा वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. दुपारी दोन वाजता अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.