MP Udayaneraje Bhosale On Akshay Shinde Encounter Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Statement : अक्षय शिंदे 'एन्काऊंटर'वर उदयनराजेंची पहिलीच पण रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, 'अशांना गोळ्या घालून नाही तर...'

MP Udayaneraje Bhosale First Reaction On Badlapur Accused Akshay Shinde Encounter : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती, त्या प्रकारचीच न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा,असेही उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Deepak Kulkarni

Satara News : बदलापूर चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं.तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटनंतर आरोप - प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत विरोधकांना सुनावलं आहे.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी बदलापूर घटनेतील मुख्य आरोपीच्या एन्काऊंटरवर बेधडक भाष्य केले. ते म्हणाले, अशा गुन्हेगारांना गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज झाले. या लोकांना जनतेत सोडले पाहिजे. आणि जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

खासदार उदयनराजेंनी यावेळी पोलिसांच्या एन्काऊंटरवर शंका उपस्थित करणार्‍यांना चांगलेच फटकारले. ते म्हणाले, पीडित मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते,त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वत:ला ठेवून मी बोलत असतो.सत्ताधारी -विरोधक मला काही घेणं देणं नाही. सत्ताधारी असू दे किंवा विरोधक जे कोणी असू दे त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रसंग घडला असता तर काय केलं असतं? असं बोलले असते का? असा खडा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.

उदयनराजे यांनी बलात्कार केला की सरळ लोकांसमोर त्याला फाशी द्या,अशी संतप्त भूमिकाही मांडली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती, त्या प्रकारचीच न्यायव्यवस्था आता असायला हवी. त्यासाठी कायद्यात बदल करावा लागला तरी काही हरकत नाही, असेही उदयनराजे यांनी स्पष्टपणे सांगितले.

संजय राऊत काय म्हणाले...?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटरवरुन गंभीर आरोप केले आहेत. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना वाचवायचे असल्याने त्यांनी मुख्य पुरावा नष्ट केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

खासदार संजय राऊतांनी एक सफाई कर्मचारी पोलिसांच्या कमरेवरची बंदूक हिसकावून त्यातून गोळी झाडतो, हे कोणाला पटेल का? सफाई कर्मचारी कधीपासून बंदूक चालवू लागला असं प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूबद्दल हळहळण्याचे काहीच कारण नाही, देशभरातील बलात्काऱ्यांना अशा प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे, याबद्दल दुमत नाही, असे राऊत म्हणाले. संबधित शाळा ही भारतीय जनता पक्षाशी संबधीत आहे. शाळेच्या पदाधिकारी हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT