Sharad Pawar Politic's : रमेश कदमांनी दुसऱ्यांदा घेतली पवारांची भेट; मोहोळमधून तुतारीवर लढण्याचा निर्धार

Ramesh Kadam Meet Sharad Pawar : रमेश कदम यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत प्रामुख्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar-Ramesh Kadam
Sharad Pawar-Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 September : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेत आहेत. दुसरीकडे, मोहोळचे माजी अमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे जाऊन पुन्हा भेट घेतली आहे.

माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) हे पुन्हा एकदा मोहोळमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी यापूर्वीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्धार रमेश कदम यांनी केला आहे.

मेश कदम यांनी २०१४ मध्ये मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) चिन्हावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांना अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणी अटक झाली होती. वर्षभरापूर्वी ते जामिनावर कारागृहातून बाहेर आले आहेत.

दरम्यान, तुरुंगात असतानाही रमेश कदम यांनी २०१९ मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीतही त्यांना २४ हजाराच्या जवळपास मते मिळाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मोहोळमध्ये त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Sharad Pawar-Ramesh Kadam
Ajit Pawar : तुम्ही संजयमामाला पुन्हा आमदार करा, मी ‘आदिनाथ, मकाई’ला चांगले दिवस दाखवेन; अजितदादांचा वादा

रमेश कदम यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत प्रामुख्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार रमेश कदम आणि शरद पवार यांच्यातील भेटी महत्वाची मानली जात आहे.

लोकसभेला राम सातपुतेंना पाठिंबा

माजी आमदार रमेश कदम यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. ते एमआयएमकडून निवडणूक लढतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, एमआयएमने सोलापूर मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कदम यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय बदलला होता. त्यांनी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता.

Sharad Pawar-Ramesh Kadam
Akshay Shinde Encounter : दोन पोलिसांमध्ये बसलेल्या अक्षय शिंदेने पुढच्या पोलिसाचा रिव्हॉल्व्हर काढलाच कसा? जयंत पाटलांचा सवाल

महायुतीकडून यशवंत मानेंची उमेदवारी जाहीर

मोहोळ मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) यशवंत माने हे आमदार आहेत. आगामी निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील यांनी यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीकडून यशवंत माने यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com