Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Politics : भाजप-शिवसेनेत पडद्यामागील कुरघोडीतही चुरस; कोण मारणार मैदान?

Kolhapur Political News BJP Shiv Sena Latest Update : जिल्हास्तरावर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्याला देखील टार्गेट दिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागली आहे. निवडणूक लागेल त्यावेळी लागेल, पण कार्यकर्त्यांना प्रवाहात ठेवण्याचे काम महायुतीतील पक्ष करत आहेत. अशातूनच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेने सदस्य नोंदणीचे काम हातात घेतले आहे.

जिल्हास्तरावर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात चुरस निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या पदाधिकाऱ्याला देखील टार्गेट दिले आहे. त्या अनुषंगाने उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदस्य नोंदणीत दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील फडणवीस शिंदे गटात सुरू असलेल्या पडद्यामागील इर्षने जिल्ह्यातील सदस्य नोंदणीने स्पर्धा निर्माण झाली आहे.

भाजपकडून एक जानेवारीपासून सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. त्यातील वाढता प्रतिसाद पाहता भाजपकडून ही मुदत 19 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीन लाख सदस्य नोंदणीचा टप्पा पार केल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या सदस्य नोंदणी मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागेल त्यावेळी लागेल, एकत्र लढू अगर स्वतंत्र लढू, मात्र जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आपले अस्तित्व निर्माण करण्याची धडपड महायूतीमध्ये सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली असली तरी, अंतर्गत लढाई यापुढे भाजप आणि शिवसेनेचे असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे. खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके व सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेनेची ताकद आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते आमदार अमल महाडिक आणि आमदार राहुल आवाडे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील तीन आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या दोघांमध्येच अंतर्गत ईर्षा आणि स्पर्धा सुरू झाली आहे.

संख्याबळ आणि बेरजेच्या सूत्रानुसारच राजकीय भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती झाले तरी पक्ष पातळीवर पक्षाला संख्याबळ महत्त्वाचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी सदस्यांची मी का महत्त्वाचे आहे. मतदारसंघातील असलेल्या प्राबल यामुळेच पक्षाचे संख्याबळ वाढत असते. त्यावरच पक्षाचे राजकारण अवलंबून आहे.

भाजपने आणि शिंदेंच्या शिवसेने देखील शहर स्तरावर कोल्हापूर उत्तर, दक्षिण करवीर विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिका आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत असलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची संख्या पाहता अधिक आहे. त्यामुळेच संख्याबळाचा विचार करून अंतर्गत स्पर्धा सदस्य नोंदणीत सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT