Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Politics : खबर पक्की हैं! कुछ तो होने वाला हैं! सांगलीत नितीन गडकरीचं जयंत पाटील स्वागत करने वाले हैं!

BJP Union Minister Nitin Gadkari NCP SharadChandra Pawar party state president Jayant Patil Sangli : भाजप नेते नितीन गडकरी सांगलीत येणार असून, तिथं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत पुरता धुव्वा उडाला. महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सैरभैर झाले असून, पक्ष सोडणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेला आता पुन्हा हवा मिळाली आहे. भाजप नेते नितीन गडकरी सांगलीतील जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने त्यांच्या भाजप संपर्काच्या चर्चा वाढल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भाजप (BJP) नेते केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आज दुपारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इस्लामपूरमधील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशिअमचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा सर्वच क्षेत्रातील गाढा अभ्यास आहे, अशा बहुआयामी नेत्याचे उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभावे, हाच उद्देश ठेवून मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केल्याचे आयोजकांकडून सांगितले जात आहे. तसंच नितीन गडकरी आज राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहला देखील भेट देणार आहेत. कासेगाव शिक्षण संस्थेच्या आरआयटी या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय प्रांगणात सुसज्ज आणि अद्ययावत इमारतीचे उद्घाटन करतील.

नितीन गडकरी यांचा हा दौरा जयंत पाटील यांच्या संस्थेत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील राष्ट्रवादी सक्रिय नाही. याशिवाय जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांचा पक्षातील छुपा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा आहे.

पाटलांना मिळणार गिफ्ट

नितीन गडकरी जयंत पाटील यांच्याच संस्थांच्या कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर राजकीय गणितांवर चर्चा होणार नाही, असे होणार नाही. त्यामुळे गडकरी यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. जयंत पाटील यांचा रविवार (ता. 16) फेब्रुवारी वाढदिवस झाला आहे. त्यामुळे नितीन गडकरी आणि जयंत पाटील या दौऱ्यांना एकमेकांना काय भेट देतात, याकडे राजकीय लक्ष असणार आहे.

गडकरी तीन तास थांबणार

या दौऱ्यात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर नितीन गडकारी यांच्याशी बंद दाराआड चर्चा होते की काय, याकडे देखील लक्ष राहणार आहे. जयंत पाटील यांच्या संस्थेत नितीन गडकरी जवळपास तीन तास थांबणार आहेत. गडकरींनी पाटलांना दिलेला एवढ्या वेळीची देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT