Mahayuti Politcs : महायुतीत ताणाताणी, 'स्थानिक' पूर्वी तुटण्याचीच अधिक शक्यता; चंद्रकांत पाटील नेत्यांच्या स्वबळाच्या भाषेवर संतापले

BJP Minister Chandrakant Patil Mahayuti Pandharpur : स्थानिक संस्था निवडणुकीत स्वबळाच्या नारा देणाऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांच्या विधानावर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कधीही घोषणा होऊ शकतात. महायुतीमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांनी स्थानिकच्या निवडणुकांना समोरे जाताना बरीच तयारी केली आहे.

महायुतीमधील नेते स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे महायुतीमधील वातावरण गढूळ झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती तुटण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. या ताणाताणीवर भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीमधील नेत्यांना सुनावले आहे.

चंद्रकांत पाटील पंढरपूर दौऱ्यावर असताना, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले. या निवडणुकांना समोरे जाताना भाजप (BJP) स्वबळावर समोरे जाणार का? या प्रश्नावर त्यांनी महायुतीमधील नेत्यांना सुनावले. महायुतीत स्वबळाची भाषा करणाऱ्यांना त्यांचे राजकारण अपरिपक्वपणा दिसतो आहे, असा टोला लगावला.

Chandrakant Patil
Supriya Sule : एकनाथ शिंदेंच्या दिल्ली सत्कारानं ठाकरे शिवसेना दुखावली; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

चंद्रकांत पाटील म्हणाले, "स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत महायुतीमधील काही नेते स्वबळाचा नारा देत असतील, तर ते अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे". प्रभाग रचना आहे. शहरी निवडणुका (Election) की ग्रामीण , कोणत्या भागात कोणाची ताकद आहे. त्यावर चर्चा होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Chandrakant Patil
Shivsena Politics : 'राजा का बेटा राजा नही बनेगा'; उदय सामंत यांचे तिसऱ्या टप्प्यातील प्रवेशांवर सूचक विधान

'जेव्हा निवडणुका घोषित होईल, तेव्हा त्या वेळची परिस्थिती काय असेल त्यावर निर्णय होईल. खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलणे योग्य आहे, असे म्हणत जे काही नेते स्वबळाचा नारा देत, असतील तर त्यांचा तो अपरिपक्वपणा आहे', असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीत राहून एकला चलो रेची भाषणा शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी ऐरोलीतील कार्यक्रमात बोलवून दाखवली आहे. त्यामुळे महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून धुसफूस रंगली आहे. या निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी नेत्यांचा युती टिकवण्यासाठी कस लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com