Jaykumar Gore-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : सोलापुरात भाजपचा विजय निश्चित : महायुतीकडे 74 टक्के मते; धैर्यशील मोहिते पाटलांच्या डावपेचाकडे लक्ष

Solapur Election news : सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे स्पष्ट वर्चस्व असल्याने विधान परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार निश्चित मानला जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत सोलापूर जिल्ह्यात नंबर एकचे स्थान पटकाविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून ५५५ मतदार मतदान करणार आहेत. या एकूण मतदारांपैकी महायुतीचे ४०६ मतदार आहेत, यात एकट्या भाजपचे ३१३ मतदार आहेत, त्यामुळे सोलापुरातून भाजपचा आमदार होणार हे निश्चित आहे. मात्र, उमेदवारी परिचारक की आणखी कोणाला, एवढाच प्रश्न शिल्लक आहे.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक तब्बल ४ वर्षे उशिराने होत आहे. सोलापूरची निवडणूक २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर प्रशासक असल्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान सर्वच निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच चार नगराध्यक्ष आणि तब्बल १४४ जागा निवडून आणल्या होत्या. याशिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात माढा, माळशिरस आणि नातेपुते या नगरपालिका आणि श्रीपूर महाळुंग नगरपंचायतीत भाजपने काही जागा जिंकल्या हेात्या. त्यामुळे एकूण ५५५ मतदार असलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत एकट्या भाजपने ३१३ मतदार आहेत. यामध्ये स्वीकृत सदस्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

भाजपसोबत महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यात शिंदेसेनेने लक्षणीय यश मिळविले आहे. त्यांनी ६६ जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस २७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ हे ४०६ वर जाते, महायुतीला म्हणजे भाजपसाठी सोलापूर विधान परिषदेची निवडणूक ही एकतर्फी असणार आहे, हे निश्चित.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडे ४०६ तर, तर विरोधकांकडे केवळ ५७ मते आहेत. यात २०२२ मधील आघाडीची काही मते विरोधकांकडे जाऊ शकतात. त्यामुळे विरोधकांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या डावपेचाकडे लक्ष असणार आहे.

भाजपचे संख्याबळ

जिल्हा परिषद : ३८

पंचायत समिती : १०

महापालिका : ८७

नगरपालिका-नगरपंचायत : १७८

एकूण : ३१३

........................

शिवसेना : ६६

राष्ट्रवादी काँग्रेस : २७

महायुतीचे एकूण संख्याबळ : ४०६

(राष्ट्रवादीत आलेले माढ्यातील साठे गटाचे १३ नगरसेवक काँग्रेसकडून निवडून आलेले आहेत)

महाविकास आघाडीतील पक्षाचे संख्याबळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : २६

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : २७

काँग्रेस ०४

एकूण : ५७

२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षनिहाय संख्याबळ

श्रीपूर महाळुंग (एकूण १७ जागा)

मोहिते पाटील समर्थक आघाडी : १०

एकत्रित राष्ट्रवादी (शिंदे समर्थक) : ०६

भाजप : ०१

..............

नातेपुते (१७)

स्थानिक आघाडी (बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, माऊली पाटील नेतृत्व) : ११

डी. वाय. राऊत आणि दादासाहेब उराडे : ०६

..................

माळशिरस (१७)

भाजप : १०

एनसीपी : ०२

मनसे : ०२

अपक्ष : ०३

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT