Nagar Panchayat Election News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाजपचा दे धक्का! तीन नगरपंचायतींवर फडकावला झेंडा तर राष्ट्रवादी-काँग्रेसला प्रत्येकी एक

सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील या पाच नगपरिषदांच्या अध्यक्ष निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यात तीन ठिकाणी भाजपने (BJP) बाजी मारली आहे. काँग्रेसला (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) प्रत्येकी एका नगरपरिषदेत विजय मिळवता आला आहे.

माळशिरस, नातेपुते, महाळुंग श्रीपूर या तीन नगरपंचायतीवर भाजपचे (BJP) नगराध्यक्ष निवडून आले आहेत. माढा नगरपंचायतीवर काँग्रेसच्या (Congress) मीनल साठे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीच्या सुजाता डोळसे या निवडून आल्या आहेत. श्रीपूर म्हहाळुंगमध्ये भाजपच्या लक्ष्मी चव्हाण विजयी झाल्या आहेत. नातेपुतेमध्ये भाजपच्या वर्षाराणी पलंगे तर माळशिरसमध्ये भाजपचे अप्पासाहेब देशमुख निवडून आले आहेत. (Nagar Panchayat Election News)

जिल्ह्यांतील पाचपैकी तीन नगरपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला आहे. दरम्यान माळशिरसमध्ये (Malshiras) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीची (NCP) युती झाली आहे. नगराध्यक्षपद भाजपाकडे तर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. राष्ट्रवादीच्या माघारीमुळे मोहिते पाटील समर्थक असलेल्या विकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मी अशोक चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीची केवळ आता औपचारीकता उरली होती.

असे आहेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष

माढा - मीनल साठे (काँग्रेस)

श्रीपूर महाळुंग - लक्ष्मी चव्हाण (भाजप)

नातेपुते - वर्षाराणी पलंगे (भाजप)

माळशिरस - अप्पासाहेब देशमुख (भाजप)

वैराग - सुजाता डोळस (राष्ट्रवादी)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT